
महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) गेल्या काही दिवसांपासून विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. शिंदे गट आणि भाजप राज्यात सत्तेवर आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) गेल्या काही दिवसांपासून विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. शिंदे गट आणि भाजप राज्यात सत्तेवर आहे. असे असताना मात्र दहिसरमध्ये भाजप पदाधिकारी आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याचे पाहिला मिळाले. बॅनरवरून झालेल्या वादात भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यामध्ये भाजप पदाधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला.
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप पदाधिकारी विभीषण वारे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात विभीषण वारे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यात विभीषण वारे यांच्या पाठीला, खांद्याला आणि छातीला दुखापत झाली आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्यासोबत विभीषण वारे हे गेल्या अनेक वर्षांपासून काम करत होते. मात्र, त्यांनी शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या रागातून हा हल्ला झाल्याचा संशय विभीषण वारे यांनी व्यक्त केला.
पोलिसांकडून दोघांना अटक
विभीषण वारे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर याप्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यात आली. पोलिसांनी या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला असून, यामध्ये दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, हा हल्ला सूडभावनेतेून झाला असल्याचे वारे यांनी सांगितले. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत दोन जणांना अटक केली असून, आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.