शिंदे-ठाकरे एकत्र येणार? बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त तैलचित्राचं आज अनावरण, मात्र उद्धव ठाकरे उपस्थित राहणार का? सर्वांचे लक्ष…

उद्धव ठाकरेंचं नाव निमंत्रण पत्रिकेतून पूर्णपणे वगळण्यात आलं आहे. त्यामुळे तैलचित्रावरून वाद निर्माण निर्माण झाला होता. कारण मात्र वेगळ सांगण्यात आलं होतं. त्यामुळं आज शिंदे-ठाकरे एकत्र येणार का? आणि उद्धव ठाकरे उपस्थित राहणार का? याकड सर्वांचे लक्ष आहे.

  मुंबई– आज विधानभवनात हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त तैलचित्राचे अनावरण (सोमवार 23 जानेवारीला) होणार आहे. बाळासाहेबांच्या जन्मदिनी (Birth Annivesary) औचित्य साधत त्यांच्या तैलचित्राचे अनावरण होणार आहे. या सोहळ्याची निमंत्रण पत्रिका नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. हा शासकीय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता प्रसाद ओक (Actro prasasd oak) करणार आहे. मात्र, या निमंत्रण पत्रिकेत बाळासाहेबांचे पुत्र आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांच्या नावाचा उल्लेख नाही. ठाकरेंचं नाव निमंत्रण पत्रिकेतून पूर्णपणे वगळण्यात आलं आहे. त्यामुळे तैलचित्रावरून वाद निर्माण निर्माण झाला होता. कारण मात्र वेगळ सांगण्यात आलं होतं. त्यामुळं आज शिंदे-ठाकरे एकत्र येणार का? आणि उद्धव ठाकरे उपस्थित राहणार का? याकड सर्वांचे लक्ष आहे.

  कारण माहितेय आहे का?

  हा संपूर्ण शासकीय कार्यक्रम आहे, त्यामुळं राजशिष्टाराचे पालन होणार आहे. तसेच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना दुसरी निमंत्रण पत्रिका पाठवण्यात येणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी यांनी मागील आठवड्यत दिली होती. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिंदे-ठाकरे एकत्र येणार का? याची चर्चा सुरु झाली आहे. तसेच आता या सोहळ्याला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 23 तारखेला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजे आज मुंबईतील विधानभवनात तैलचित्र अनावरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

  उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना वेगळं आमंत्रण

  या पत्रिकेतून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख प्रोटोकॉल प्रमाणे टाळण्यात आला आहे. परंतु, त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. विधिमंडळ सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनाही आमंत्रित केले आहे. तसेच यांना दुसरी निमंत्रण पत्रिका पाठवण्यात येणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिली आहे.

  हे मान्यवर राहणार उपस्थित…

  दरम्यान, या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच बाळासाहेबांचे तैलचित्र देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे. स्नेहांकीत म्हणून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची नावे आहेत. तसेच, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांचेही नावं आहे. मात्र, या पत्रिकेतून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख प्रोटोकॉल प्रमाणे टाळण्यात आला आहे. परंतु, त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे.