शिंदखेडा पंचायत समितीचा लाचखोर कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

गटविकास अधिकारी देवरे याने अंतीम वेतन प्रमाणपत्र देण्यासाठी समक्ष बोलविले असून त्यांच्याशी सदर विषयावर चर्चा करु अंतीम वेतन प्रमाणपत्र देण्यात येण्याबाबतची माहिती देखील तक्रारदाराने केली. एसीबीच्या पथकाने शिंदखेडा येथे जावून तक्रारदाराची भेट घेवुन तक्रार नोंदवून घेतली. १८ जुलै रोजी या तक्रारीची पडताळणी केली असता कनिष्ठ सहाय्यक किरण मोरे यांनी तक्रारदाराकडे अंतीम वेतन प्रमाणपत्र देण्यासाठी गटविकास अधिकारी देवरे यांच्यासाठी ४ हजार रुपये व स्वतःसाठी २ हजार रुपये अशी एकूण तडजोडी अंती सहा हजार रुपयांची मागणी केली.

    धुळे : अंतीम वेतन प्रमाणपत्रासाठी ग्रामसेवकाकडे ८ हजाराची लाच मागणार्‍या पंचायत समितीच्या लाचखोर कर्मचार्‍याला धुळ्याच्या देवपुर भागात लाच घेतांना एसीबीने सापळा रचुन पकडले आहे. त्याच्या विरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    शिंदखेडा पंचायत समितीअंतर्गत वाघाडी खुर्द येथे ग्रामसेवक असलेल्या कर्मचार्‍याची पदोन्नतीने ग्रामविकास अधिकारी या पदावर शिरपूर पंचायत समिती येथे बदली झाली. दि.१८ एप्रिल रोजी त्यांना कार्यमुक्त करण्यात आले होते.अंतीम वेतन प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शिंदखेडा पंचायत समितीचा कनिष्ठ सहाय्यक किरण मोरे याची हे ग्रामविकास अधिकारी वेळोवेळी भेट घेत होते. किरण मोरेने त्यांच्याकडे ८ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.याप्रकरणी ग्रामविकास अधिकार्‍याने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दुरध्वनीद्वारे तक्रार केली.

    गटविकास अधिकारी देवरे याने अंतीम वेतन प्रमाणपत्र देण्यासाठी समक्ष बोलविले असून त्यांच्याशी सदर विषयावर चर्चा करु अंतीम वेतन प्रमाणपत्र देण्यात येण्याबाबतची माहिती देखील तक्रारदाराने केली. एसीबीच्या पथकाने शिंदखेडा येथे जावून तक्रारदाराची भेट घेवुन तक्रार नोंदवून घेतली. १८ जुलै रोजी या तक्रारीची पडताळणी केली असता कनिष्ठ सहाय्यक किरण मोरे यांनी तक्रारदाराकडे अंतीम वेतन प्रमाणपत्र देण्यासाठी गटविकास अधिकारी देवरे यांच्यासाठी ४ हजार रुपये व स्वतःसाठी २ हजार रुपये अशी एकूण तडजोडी अंती सहा हजार रुपयांची मागणी केली. ही रक्कम धुळे येथे द्यावी असेही त्यांनी सांगितले होते. किरण मोरेनी तक्रारदाराला आज सकाळी ८.४५ वाजता देवपुरच्या दत्तमंदिर चौकात प्रमाणपत्र घेण्यासाठी बोलविले.

    लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला.६ हजाराची लाच स्विकारताना किरण मोरेला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले.एसीबीचे धुळे विभागाचे पोलिस उपअधिक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय मंजीतसिंह चव्हाण, प्रकाश झोडगे, राजन कदम, शरद काटके,कैलास जोहरे, भूषण खलाणेकर, संतोेष पावरा,भूषण शेटे, गायत्री पाटील, संदीप कदम, रामदास बारेला, सुधिर मोरे, जगदीश बडगुजर, प्रशांत बागुल, प्रविण पाटील, वनश्री बोरसे, रोहिणी पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.