टीका टिप्पणी करण्यापेक्षा अमोल कोल्हे यांनी येणारी निवडणूक कशी जिंकणार यासाठी प्रयत्न केला पाहिजे – खासदार श्रीकांत शिंदे

कल्याण मधील नांदवली तलाव येथे छटपूजा निमित्त खासदार श्रीकांत शिंदे आले होते. कल्याण मधील नांदीवली तलावावर छ्ठपूजेसाठी मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय नागरिक जमा होतात.

    कल्याण : शिरुरचे खासदार अमोल कोल्हेंनी राज्यसरकारच्या कारभाराची अवस्था बैलगाडा शर्यतीसारखी झाल्याची टीका केली होती. या टिकेला खासदार श्रीकांत शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. खासदार शिंदे यांनी याआधी महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसण्याचे काम केलं. महायुती सरकारच्या काळात शेतकऱ्यांना साडेबारा हजार कोटींची मदत देण्यात आली महायुतीचा सरकार शेतकऱ्यांसोबत उभे आहे. टीका टिप्पणी करण्यापेक्षा अमोल कोल्हे यांनी आपल्या मतदारसंघात येणारी निवडणूक कशी जिंकणार यासाठी प्रयत्न केला पाहिजे, टीका टिपणी करणाऱ्यांना नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीने त्यांचं स्थान दाखवून दिलंय. या निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळाले येणाऱ्या काळात लोकांसाठी काम करा, टीका टिपणी करण्यासाठी पूर्ण आयुष्य पडलय, येणाऱ्या निवडणुकीत आपापल्या स्थान कसे काय पक्क ठेवता येईल यासाठी प्रयत्न करा असा सल्ला खासदार श्रीकांत शिंदे यांनी खासदार कोल्हेना दिला आहे.

    कल्याण मधील नांदिवली तलावावर छटपूजे निमित्त गर्दी
    कल्याण मधील नांदवली तलाव येथे छटपूजा निमित्त खासदार श्रीकांत शिंदे आले होते. कल्याण मधील नांदीवली तलावावर छ्ठपूजेसाठी मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय नागरिक जमा होतात. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी उत्तर भारतीय नागरिकांना शुभेच्छा दिल्या. तसेच छटपूजेच्या वेळी आपल्यासाठी आशीर्वाद मागतानाच भारतीय संघ वर्ल्ड कप जिंकावा म्हणून प्रार्थना करण्याचे देखील आवाहन केलं. यावेळी खासदार शिंदे यांनी नांदिवली तलावाच्या सुशोभीकरणासाठी ५० लाखांचा निधी मंजूर झाला असून लवकरच सुशोभीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड विभाग प्रमुख रामदास ढोणे माजी नगरसेवक मल्लेश शिट्टी कल्याण पूर्व विधानसभा प्रमुख निलेश शिंदे उपस्थित होते.