राज्यासह देश-विदेशात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी; छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवनेरीवर शासकीय मानवंदना, शिवनेरीवर मानापमान नाट्य, नेमकं काय घडलं?

आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) शिवनेरीवर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी या सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीत आणि राज्यगीताने शिवजयंती सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. तसेच महिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील पाळणा म्हटला.

शिवनेरी– राज्यासह देश-विदेशात आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. दरम्यान, रायगड (Raigad) तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची स्थळी शिवनेरीवर (Shivneri) मोठ्या दिमाखात शिवजयंती साजरी होत आहे. दरम्यान, आज छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवनेरीवर शासकीय मानवंदना देण्याती आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. तसेच पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रवीण दरेकर, अतुल बेनके, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे आदी उपस्थित होते.

राष्ट्रगीत, राज्यगीत आणि पाळणा…

दरम्यान, आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) शिवनेरीवर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी या सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीत आणि राज्यगीताने शिवजयंती सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. तसेच महिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील पाळणा म्हटला. यावेळी या पाळण्याचा सोहळ्यात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तसेच अन्य नेते सहभागी झाले होते. तसेच सोहळ्यात छत्रपती संभाजी महाराज यांना सहभागी करून न घेतल्याने स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप निर्माण झाला होता.

शिवप्रेमीमध्ये संताप…

शिवनेरी किल्लावर शिवप्रेमीना अडवले गेल्यानं शिवप्रेमीमध्ये संतापाची लाट असून, संभाजीराज देखील भडकले आहेत. कोणावर दुजाभाव करु नका असं म्हटले. जोपर्यंत सर्व शिवभक्तांना किल्ल्यावर प्रवेश देत नाही, तो पर्यंत मी देखील किल्ल्यावर येणार नसल्याची भूमिका घेतली. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

रायगडमध्ये उत्खनन तर वढू बुद्रुकात 397 कोटींचा निधी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याला 350 वर्षे पूर्ण होत आहे. सर्व शिवभक्तांना सोबत घेऊन आम्ही महाराजांची विचार स्मारके जनतेपर्यंत पोहोचवण्याच काम करत आहोत. संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड येथे सरकारतर्फे उत्खनन करण्यात येत आहे. त्यात अनेक नवीन गोष्टी समोर येत आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या विकासनिधीमध्ये आता गडकिल्ल्यांकरिता निधी राखून ठेवला जात आहे. तसेच छत्रपती संभाजी महाराजांची समाधी ज्या वढू बुद्रुक येथे 397 कोटींच्या विकास आराखड्याला राज्य सरकारने मान्यता दिली आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पुढील वर्षी नियोजन करु…

दरम्यान, आज शिवजयंतीला शिवनेरीवर शिवप्रेमीना अडवले गेल्यानं शिवप्रेमीमध्ये संतापाची लाट असून, शिवप्रेमी तसेच संभाजीराजेंनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, यानंतर म्हणजे पुढील वर्षी शिवजन्मोत्सव सोहळ्यादरम्यान शिवनेरीवर येण्यापासून कोणाचीही अडवणूक करणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. पुढील वर्षी नियोजनबद्द सोहळा होईल, त्यामुळं कोणाचीही अडवणूक होणार नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसा यांनी म्हटले. शिवरायांना वंदन केल्यानंतर किल्ले शिवनेरीवर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.