पुण्यात शिवसैनिक आक्रमक, उदय सामंतांच्या गाडीवर हल्ला

राज्याचे माजी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला आहे. पुण्यात ही घटना घडली. शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्यात सामंत यांच्या गाडीची काचही फुटली.

    पुणे – राज्याचे माजी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला आहे. पुण्यात ही घटना घडली. शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्यात सामंत यांच्या गाडीची काचही फुटली. विशेष म्हणजे, शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेसाठी तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील आज पुण्यात आहेत. त्याचदरम्यान ही घटना घडली.

    शिवसेना नेते तानाजी सावंत यांच्या घराकडे उदय सामंत जात असतानाच हा प्रकार घडला आहे. शिवसंवाद यात्रेनिमित्त आदित्य ठाकरे यांची नुकतीच कात्रज चौकात सभा झाली. ही सभा होताच शिवसैनिकांनी हा हल्ला केला. उदय सामंत यांची गाडी दिसताच शिवसैनिकांनी ही गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. शिवसैनिकांनी ‘गद्दार, गद्दार’ अशी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, त्यांच्या गाडीवर हात मारायला सुरुवात केली. यात सामंत यांच्या गाडीची काच फुटली.