शिवसैनिकांनी संतोष बांगर यांचा आदेश धुडकावला…

आमदार संतोष बांगर यांनी हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. त्यानतंर आता पुन्हा हिंगोलीत शिवसेना शिंदे गटात पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहेत. बांगर यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन वाढवण्यासाठी बैठक आयोजित केली होती. मात्र शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी हिंगोली जिल्ह्यातील शिवसैनिकांची कोणत्याही प्रकारची बैठक नसल्याचे सांगत कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी आजच्या बैठकीला उपस्थित राहू नये, असे थेट आवाहन केले आहे.

    हिंगोली : उद्धव ठाकरेंसाठी ढसाढसा रडणारे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांची हिंगोली जिल्ह्याच्या जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. बंडखोरी केल्याने त्यांची शिवसेनेच्या हिंगोली जिल्हाध्यक्षापदावरून हकालपट्टी करण्यात आली. तरिही आमदार संतोष बांगर यांनी हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. त्यानतंर आता पुन्हा हिंगोलीत शिवसेना शिंदे गटात पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहेत.

    शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन वाढवण्यासाठी बैठक आयोजित केली होती. आज सकाळी ११ वाजता हिंगोलीच्या शासकीय विश्रामगृहात ही बैठक आयोजित केली आहे. मात्र शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी हिंगोली जिल्ह्यातील शिवसैनिकांची कोणत्याही प्रकारची बैठक नसल्याचे सांगत कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी आजच्या बैठकीला उपस्थित राहू नये, असे थेट आवाहन केले आहे. त्यामुळे या शिंदे गटाच्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील कोण कोणते शिवसेना पदाधिकारी उपस्थित राहतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

    विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीत त्यांनी विधिमंडळात शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केले होतं मात्र, बहुमत चाचणी सिद्ध करत असताना त्यांनी अचानकपणे शिंदे गटाला मतदान केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या समर्थकांना घेऊन मुंबई गाठत मुख्यमंत्री शिंदे यांना समर्थन देत त्यांचा सत्कार केला आणि थेट ‘मातोश्री’ला आव्हान दिले होते.

    बांगर यांनी घेतलेल्या बंडाच्या भूमिकेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची हिंगोली जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी केली होती. त्यानंतर बांगर चांगलेच संतप्त झाले आणि त्यांनी थेट ठाकरेंनाच आव्हान दिले आहे. माझी या पदावर बाळासाहेब ठाकरे यांनी नेमणुक केल्याने या पदावरून मला कोणीही काढू शकत नाही, असे त्यांनी ठाकरेंना ठणकावून सांगितले आणि शिंदे यांचीच खरी शिवसेना म्हणत शिंदेनी आपल्याला जिल्हाप्रमुख म्हणून कायम ठेवल्याचे सांगत खुलेआम ठाकरेंनाच आव्हान दिले आहे.