उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसैनिकांची पुण्यात घोषणाबाजी…

एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेनेचे कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध आक्रमक झाले आहेत. राज्यात विविध ठिकाणी शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना समर्थन देण्यासाठी आंदोलन केले आहे पुण्यात सुद्धा शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी घोषणाबाजी केली आहे.

    पुणे : शिवसेनेचे नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार पडण्याची शक्यता झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाराज झाले आहेत. एकनाथ शिंदे हे ३५ आमदार घेऊन सुरत मधील एका हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे काही मागण्या केल्या आहेत.

    एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेनेचे कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध आक्रमक झाले आहेत. राज्यात विविध ठिकाणी शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना समर्थन देण्यासाठी आंदोलन केले आहे पुण्यात सुद्धा शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी घोषणाबाजी केली आहे. आज उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ संत कबीर चौक, नाना पेठ येथे शिवसैनिकांनी पाठिंबा दर्शवण्यासाठी घोषणाबाजी केली.

    दरम्यान यावेळी नगरसेवक विशाल धनवडे, गजाननजी पंडित, उमेशजी गालीदे, चंदन साळुंखे , स्वाती कथलकर , जावेद खान, रुपेश अप्पा पवार, संदीपजी गायकवाड, सनी गवते,मुकुंद चव्हाण, रवी निंबाळकर, योगेश खेंगरे,भाऊ शिंदे, राजेश राऊत, ज्ञाणंद कोंढरे, निलेश धनगर, शुभम दुगाने, सागर भोसले, बाबू परदेशी, परेश खांडके, कुणाल पवार, मयूर धनवडे, अनिकेत थोरात, सुनीता दगडे, गौरी हेंद्रे, आकाश शेरे ,वेंकयटेश पवार, कुणाल झेंडे,तुषार धनवडे , सनी मुसळे, विजय शेळके, शुभम धायगुडे, उवेज बेग, प्रतीक जळगावकर, अमोल धनवडे आदी शिवसैनिक उपस्थित होते.