ठाणे शिवसेना जिल्हाप्रमुख पदावर केदार दिघे यांची नियुक्ती

शिवसेनेतील बंडखोरीनंतर नेत्याविना असलेल्या ठाण्यातील शिवसेनेला अखेर नेता मिळाला आहे. तसेच शिवसेनेतील बंडखोर नेत्यांकडून सातत्याने आनंद दिघे यांच्या नावाचा वापर होत असतानाच उद्धव ठाकरे यांनी केदार यांची करत मोठी राजकीय खेळी खेळल्याचे बोलले जात आहे.

    मुंबई – शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख पदावर केदार दिघे यांची नियुक्ती करण्यात आली असून ते स्वर्गीय आनंद दिघे यांचे पुतणे आहेत.  शिवसेनेतील बंडखोर नेत्यांकडून सातत्याने आनंद दिघे यांच्या नावाचा वापर होत असतानाच उद्धव ठाकरे यांनी केदार यांची नियुक्ती करत मोठी राजकीय खेळी खेळल्याचे बोलले जात आहे.

    बंडखोरी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सत्ता स्थापन केली. ठाणे जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांकडून त्यांना मोठे समर्थन मिळत आहे. जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के हे सुद्धा शिंदे गटात सामील झाले. पक्षविरोधी कारवाई केल्याने उद्धव ठाकरे यांनी त्यांना पदावरून हटविले. शिवसेनेच्या गडाची पडझड सुरू असतानाही जिल्हा प्रमुख पदावर नियुक्ती केली नव्हती. त्यामुळे ठाण्यातील शिवसेना नेत्याविना असल्याचे चित्र होते.