शिवसेनेकडून केदार दिघे यांची ठाणे जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

आज ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजन विचारे, केदार दिघे, अनिता बिर्जे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मातोश्रीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

    ठाणे : ठाण्यातील शिवसेनेबाबत मोठी बातमी आहे. शिवसेनेचे दिवगंत ठाणे जिल्हाप्रमुख आंनद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांची ठाणे जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, आनंद दिघे यांच्या सहकारी असलेल्या अनिता बिर्जे यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदीप शिंदे यांच्यावर ठाणे शहर प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून चिंतामणी कारखानीस यांची ठाणे विभागीय प्रवक्ते पदावर नेमणूक करण्यात आली आहे.

    आज ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजन विचारे, केदार दिघे, अनिता बिर्जे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मातोश्रीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शिवसेनेसोबत कायम असल्याची ग्वाही शिवसैनिकांनी दिली. या भेटीनंतर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने नवीन नियुक्त्या जाहीर केल्या. शिवसेना सचिव विनायक राऊत याबाबत ही माहिती दिली आहे.