शिवसेना शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची घेतली भेट

    मुंंबई : शिवसेना-शिंदे गट वाद सुरु असतानाच याच काळात अनेक पक्षाचे नेते राज्यपालांची भेट घेताना दिसत आहेत. अशात आज शिवसेनेच्या शिष्टमंडळाने बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीत शेतकरी प्रश्नांना केंद्रीत ठेवून चर्चा करण्यात आली तसेच नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने तात्काळ मदत करावी, अशी मागणीही करण्यात आली.  यासंदर्भातील एक निवेदन शिवसेनेच्या वतीने राज्यपालांना देण्यात आले. अशी माहिती विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी दिली आहे.

    शिवसेना शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची घेतली भेट घेतली. या भेटीत अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे झालेले नुकसान, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, कायदा सुव्यवस्था या विषयावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.  यावेळी अंबादास दानवे, विरोधी पक्ष नेते, विनायक राऊत, अरविंद सावंत, अनिल परब, मनिषा कायंदे व इतर नेते मंडळी उपस्थित होते.