Shiv Sena earthquake shakes Amravati officers have tensions towards elections

शिवसेना हायकमांडने फाजील लोकांना महत्व दिले. स्वत: आमदारांना भेटायला हायकमांड जवळ वेळ नाही. त्यामुळे तेथूनच नाराजीचा सूर उमटत गेला. स्वत: शिवसेनेचे आमदार हायकमांडला भेटण्याकरिता विनवणी करीत होते. त्यामुळे आज ही नाराजी दिसून येत आहे.

  अमरावती : राज्यसभा तसेच विधान परिषद निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला (Shivsena) सातत्याने हादरे बसत आहे. विधान परिषद (vidhan parishad ) निवडणुकीनंतर मुंबईत आलेल्या भुकंपाचे धक्के अमरावतीत जाणवू लागले आहे. ऐन महापालिका, जिल्हा परिषद, नगर पालिका तसेच ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर बदलत्या राजकीय स्थित्यंतरामुळे पदाधिकाऱ्यांची धाकधूक वाढली आहे. जिल्ह्यातील शिवसेना नेते तसेच कार्यकर्त्यांचे मुंबईच्या दिशेने डोळे लागले असल्याचे राजकीय चित्र निर्माण झाले आहे.

  शिवसेना पक्ष नव्हे विचार

  शिवसेनेबाबत सद्यस्थितीत सुरू असलेल्या बाबी सांगोसांगी आहे. कोणाकडे त्याबाबत पुरावे नाहीत. एकनाथ शिंदे( Eknath Shinde ) हे कट्टर शिवसैनिक आहेत. धर्मवीर आनंद दिघे(Dharmavir Anand Dighe) यांचे शिंदे हे शिष्य आहेत. दिघे यांचा वारसा घेत संपूर्ण आयुष्य नागरिकांच्या सेवेत अर्पण करीत आहे. शिंदे हे शिवसेना सोडण्याचा निर्णय घेणार नाही. प्रत्येक पक्षात प्रत्येक जण समाधानी नाही. त्यामुळे ते असे पाऊल उचलणार नाही. मात्र, शिंदे यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला तरी शिवसेनेचे काम सुरूच राहील. शिवसेना पक्ष नसून विचारधारा आहे. विचार थांबत नाही.

  – सुनील खराटे, जिल्हा प्रमुख शिवसेना (Sunil Kharate,District head, Shivsena )

  महाविकास आघाडी सरकार पडणार

  शिवसेना हायकमांडने फाजील लोकांना महत्व दिले. स्वत: आमदारांना भेटायला हायकमांड जवळ वेळ नाही. त्यामुळे तेथूनच नाराजीचा सूर उमटत गेला. स्वत: शिवसेनेच्या आमदारांना हायकमांडला भेटण्याकरिता विनवणी करीत होते. त्यामुळे आज ही नाराजी दिसून येत आहे. यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार आहे.

  – नितीन मोहोड, उद्योजक ( Nitin Mohod,Enterpreneur )