रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी शिवसेना माजी नगरसेवकाचे स्वर्गाचे प्रवेशद्वार बॅनर आंदोलन

डोंबिवली कचोरे खंबाळपाडा या रस्त्यावर खड्डे पडल्याने गेल्या काही महिन्यात अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला गेल्या वर्षभरापासून रस्ता दुरुस्ती करण्यासाठी निवेदन देण्यात आली मात्र अद्याप पर्यंत रस्त्याच्या डागडुजीकडे प्रशासनाने लक्ष न दिल्याने येथे नियमितपणे अपघात घडत आहेत.

    कल्याण : प्रशासकीय राजवटीत (Administrative Regime) कामेच होत नसल्याने (No Work) कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत (KDMC) सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेनेचे माजी नगरसेवक कैलास शिंदे (Former Shiv Sena corporator Kailas Shinde) यांनी आज रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघात होत असल्याने प्रतिकारत्मक बॅनरवर स्वर्गाचे प्रवेशद्वार (Gate of Heaven on Resistance Banner) असा उल्लेख करत अनोखे निषेध आंदोलन (Unique Protest Movement) केले.

    डोंबिवली कचोरे खंबाळपाडा या रस्त्यावर खड्डे पडल्याने गेल्या काही महिन्यात अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला गेल्या वर्षभरापासून रस्ता दुरुस्ती करण्यासाठी निवेदन देण्यात आली मात्र अद्याप पर्यंत रस्त्याच्या डागडुजीकडे प्रशासनाने लक्ष न दिल्याने येथे नियमितपणे अपघात घडत आहेत. याबाबत शिवसेनेचे माजी नगरसेवक कैलास शिंदे यांनी आपल्या समर्थकासह रस्त्यावर उतरत आज मालिकेचा निषेध नोंदवत या रस्त्यावर स्वर्गाचे प्रवेशद्वार असा बॅनर लावत निषेध व्यक्त केला.

    गेल्या महिन्यात शिवसेनेच्या अन्य माजी नगरसेवकांनी आपल्या प्रभागात कामेच होत नसल्याने आपली उघड नाराजी पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर भाऊसाहेब दांगडे यांच्या भेटीदरम्यान व्यक्त केली होती. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत पूर्वी सत्ता उपभोगत असणाऱ्या माजी नगरसेवकांनी आत्ता नागरिकांची कामे होत नसल्याने अनोखे आंदोलन पुकारण्याचे धोरण राबवत असल्याचे दिसून येऊ लागले आहे.

    कल्याण टाटा नाक्याहून घारडा सर्कल कडे जाणारा हा रस्ता असून येथे मोठा खड्डा पडला असल्याने वाहतुकी दरम्यान दुचाकी व कारने प्रवास करणे जिकिरीचे होऊन बसले असल्याचे माजी नगरसेवक कैलास शिंदे यांनी सांगितले आहे. पालिका आयुक्त तसेच सिटी इंजिनियर यांना अनेकदा रस्ता दुरुस्तीबाबत निवेदन देऊनही दखल घेतली नसल्याचे सांगत यामुळेच या खड्ड्याजवळ स्वर्गाचे दार हे प्रतिकारत्मक आंदोलन करत असल्याची माहिती शिंदे यांनी यावेळी दिली.