‘शिवसेनेनं मुंबईला पूर्णपणे लुटलंय, यू आणि आर नावानं जात होते हप्ते’; नारायण राणेंचा घणाघात

मुंबईसाठी आम्ही तरतूद करायला लावू, मुंबईसाठी कोणत्याही प्रकल्पासाठी पैसे पाहिजे ते आम्ही उपलब्ध करु आणि आमचं ते ऐकतील एवढा मला विश्वास आहे. मुंबईत आम्ही भाजपची सत्ता आणणार म्हणजे आणणार. कारण शिवसेनेनं मुंबईला लुटलंय पूर्णपणे आता बस्स झालं, असेही नारायण राणे यांनी म्हटले आहे.

    मुंबई : शिवसेना पक्षफुटीनंतर ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिंदे गट (Shinde Group) तयार झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर भाजपसह (BJP criticizes Uddhav Thackeray) शिंदे गटाकडून सातत्याने टीका केली जात आहे. त्यानंतर आता केंद्रीयमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी निशाणा साधला. ‘शिवसेनेनं मुंबईला पूर्णपणे लुटलंय, यू आणि आर नावानं हप्ते जात होते’, असा आरोप राणेंनी केला.

    अर्थसंकल्पावर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत आपलं मत मांडलं आहे. यामध्ये त्यांनी अर्थसंकल्पाचं कौतुक केलं असून, काही वर्षात भारत जर्मनी-जपानला मागे टाकेल. या अर्थसंकल्पाला मी सर्वंकष अर्थसंकल्प म्हणेन की ज्यामध्ये देशाच्या विकासाला प्राधान्य दिलं आहे. जागतिक पातळीवर देश तिसऱ्या क्रमांकावर जावा एवढी अर्थव्यवस्था सुधारली जावी, अशी पावलं उचलण्यात आली आहेत. त्यामुळे काही वर्षात भारत जर्मनी आणि जपानलाही मागे टाकेल. केंद्राच्या प्रयत्नांमुळे दरडोई उत्पन्न आता ७९ हजारांवरुन १ लाख ९७ हजार रुपये इतके झाले आहे.

    मुंबईसाठी तरतूद करायला लावू

    या अर्थसंकल्पात उत्तर प्रदेशातील फिल्मसिटीसाठी तरतूद करण्यात आली आहे. त्यावर प्रश्न विचारल्यावर राणे म्हणाले, मुंबईसाठी आम्ही तरतूद करायला लावू, मुंबईसाठी कोणत्याही प्रकल्पासाठी पैसे पाहिजे ते आम्ही उपलब्ध करु आणि आमचं ते ऐकतील एवढा मला विश्वास आहे.

    मुंबईत भाजपची सत्ता आणणार

    मुंबईत आम्ही भाजपची सत्ता आणणार म्हणजे आणणार. कारण शिवसेनेनं मुंबईला लुटलंय पूर्णपणे आता बस्स झालं, असेही नारायण राणे यांनी म्हटले आहे.