शिंदे गटातील मंत्र्यांविरोधात शिवसेना मैदानात; महंतांना तिकीट देण्याची शक्यता

यवतमाळचे आमदार संजय राठोड यांनी शिंदे गटाची वाट धरल्यामुळे बंजारा समाजातील अनेक मतदारांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. शिंदे-फडणवीस सरकारने त्यांना मंत्रिपद दिल्यामुळे अनेक नेत्यांनी त्यांच्यासह नव्या सरकारवर निशाणा साधला होता.

    मुंबई : शिंदे गटातील मंत्री आमदार संजय राठोड (Mla Sanjay Rathod) यांना आगामी विधानसभांसह (Legislative Assembly Election) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शह देण्यासाठी शिवसेनेचे (Shivsena) सुत्र हलवायला सुरुवात केली आहे. बंजारा समाजातील (Banjara Samaj) पोहरादेवीच्या (Pohradevi) महंतांना शिवसेनेकडून निवडणुकीत तिकीट देण्याची शक्यता आहे. त्यातच पोहरादेवी मंदिराचे महंत शिवबंधन (Shivbandhan) बांधणार असल्याची चर्चा सुरू आहे.

    यवतमाळचे आमदार संजय राठोड यांनी शिंदे गटाची वाट धरल्यामुळे बंजारा समाजातील अनेक मतदारांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. शिंदे-फडणवीस सरकारने त्यांना मंत्रिपद दिल्यामुळे अनेक नेत्यांनी त्यांच्यासह नव्या सरकारवर निशाणा साधला होता. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात त्यांच्यावर आरोप होते, पण त्यांना कोर्टाने क्लीनचीट दिली आहे. त्याविरोधात शिवसेना मैदानात उतरणार आहे.

    बंजारा समाजात पोहरादेवी हे दैवत आहे. तेथील मंदिरांच्या महंतांना शिवसेनेत घेण्याचा विचार उद्धव ठाकरे यांचा आहे. लवकरच महंत शिवबंधन बांधण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर विधासभेसाठी महंतांना तिकीट देणार असल्याची माहिती सूत्रांकडून आली आहे.