बंड एकनाथ शिंदेंचं पण शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणतात, ‘आमचं बंड राष्ट्रवादीविरोधात’

राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर आल्यापासून सहा महिन्यातच जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शिवसेनेचे खच्चीकरण केले. शिवसैनिकांवर खुनासारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात पोलिसांकडून अडकवले आहे.

  इस्लामपूर : राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर आल्यापासून सहा महिन्यातच जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शिवसेनेचे खच्चीकरण केले. शिवसैनिकांवर खुनासारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात पोलिसांकडून अडकवले आहे. आमचे बंड हे पक्षाविरुद्ध नसून, राष्ट्रवादीच्या विरोधात असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार (Anandrao Pawar) यांनी जाहीर केले. बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.

  एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी दि.बा.पाटील, शकील सय्यद, सागर मलगुंडे, वीर कुदळे, राजेंद्र पवार, उमेश पवार, डॉ . सचिन पाटील, अंकुश माने, सतीश पाटील, प्रताप खराडे, सचिन कुचीवाले, योगेश हुबाले उपस्थित होते.

  आनंदराव पवार म्हणाले, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक आहोत. त्यामुळे शिवसेना कोणीही सोडणार नाही. आमचा रोष राष्ट्रवादीवर आहे. शिवसैनिकांवर होत असलेल्या अन्यायाची माहिती पक्षाच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांना दिली होती. मात्र, त्यांच्याकडून कसलाही आधार मिळाला नाही किंवा लोकमत पक्षाच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांना दिली होती.

  मात्र, त्यांच्याकडून कसलाही आधार मिळाला नाही किंवा त्यांनी लक्षही घातले नाही. त्यातच पालकमंत्री जयंत पाटील हे नेहमीच शिवसेनेची गळचेपी करत आले आहेत. पोलीस, जिल्हा, तालुका पातळीवरील सर्व विभागात त्यांनी शिवसैनिकांच्या कामाची अडवणूक करण्याचे आदेशच अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामु हे बंड राष्ट्रवादीविरुद्धच आहे.

  निधी अडवून धरला जिल्हास्तरीय समितीमध्ये शिवसैनिकांना डावलण्यात पालकमंत्र्यांची भूमिका आहे. जिल्हा नियोजनमधील एक पैशाचा निधी त्यांनी शिवसेनेला दिला नाही. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शहराच्या विकासाला दिलेला ११ कोटींचा निधी पालकमंत्र्यांनी अडवून धरला. मात्र, आमच्या पाठपुराव्याने शिंदे यांनी तब्बल २१ कोटींचा निधी दिला. या निधीतूनच शहरातील रस्ते, गटारी व इतर विकासकामे सुरू आहेत .

  आमच्या पाठपुराव्याने शिंदे यांनी तब्बल २१ कोटींचा निधी दिला. या निधीतूनच शहरातील रस्ते, गटारी व इतर विकासकामे सुरू आहेत. राष्ट्रवादीने शिवसेनेचे मोठे नुकसान केले. खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्याकडेही शिवसैनिकांनी अनेक तक्रारी केल्या आहेत. त्यावर पक्षाकडून काय कारवाई होते हे पहावे लागेल. सांगली जिल्ह्यातच तर संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादीने शिवसेनेचे मोठे सफल आहे. राष्ट्रवादीच्या मनमानीविरुद्ध हे आहे. आगामी पालिका निवडणूक ही विकास आघाडीसोबत शिवसेना म्हणूनच लढणार आहोत.