शिवसेना कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या हस्ते स्मशानभूमीचे भूमिपूजन

ग्रामस्थांच्या मागणी अनुसार खासदार निधीतून तीस लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.

    कल्याण : शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या हस्ते आशेळे गावातील जीर्ण झालेल्या स्मशान भुमीच्या नूतनीकरणसाठी भूमिपूजन करण्यात आलं. गावातील स्मशानभूमीची अवस्था अतिशय बिकट झाली असून स्थानिक गावकऱ्यांनी यासाठी वारंवार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. ग्रामस्थांच्या मागणी अनुसार खासदार निधीतून तीस लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. गुरुवारी महेश गायकवाड व स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत नूतनीकरण करण्यासाठी भूमिपूजन संपन्न झाला

    यावेळी शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी सांगितले नांदिवली, खडेगोळवली, आशेळे गाव तसेच संपूर्ण ग्रामीण पट्ट्यात ज्या-ज्या ठिकाणी स्मशानभूमी नाही किंवा त्याची परिस्थिती वाईट आहे. अशा प्रत्येक ठिकाणी खासदारांनी निधी देण्याचं काम केलं आहे. याचाच एक भाग म्हणून आशेळे गावातील स्मशानभूमीच्या नूतनीकरण करिता ३० लाखांची निधी उपलब्ध करण्यात आली आहे. गायकवाड पुढे म्हणाले की गेल्या पंधरा वर्षात या मतदार संघाची परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे ते पाहता गेल्या काही दिवसांपासून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून रस्ते कॉंक्रिटीकरण, जलजीवन योजना व इतर विकास कामे वेगाने सुरू करण्यात आले आहे.