शिवसेना नेते एकनाथ शिंदे नाराज; १३ आमदार नॉटरिचेबल

गेले काही वर्ष नाराज असलेले एकनाथ शिंदे आणि त्याच्या गटाचे आमदार यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे, अशी माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांचा नाराज गट काल सायंकाळपासूनच नॉटरिचेबल असल्याची माहिती आहे.

    विधान परिषद निवडणुकीनंतर (MLC Election) शिवसेनेतील (Shivsena) अंतर्गत धूसफूस बाहेर येत असल्याचे वृत्त आहे. शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे निकटवर्तीय शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नाराज (Angry) असल्याचे समजते. त्यातच आता त्यांचे समर्थक (Supporter) समजले जाणारे १३ आमदार नॉटरिचेबल (MLA Not Reachable) असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता मुख्यमंत्री ठाकरे यांची चिंता आणखी वाढली आहे. मध्यरात्री वर्षा बंगल्यावर (Varsha Bunglow) शिवसेना आमदारांची बैठक पार पडली.

    सोमवारी पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेने आपले दोन्ही उमेदवार विजयी करण्यात यश मिळवले. मात्र, या निवडणुकीत काँग्रेससोबत शिवसेनेचेही मते फुटली असल्याची चर्चा सुरू आहे. गेले काही वर्ष नाराज असलेले एकनाथ शिंदे आणि त्याच्या गटाचे आमदार यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे, अशी माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांचा नाराज गट काल सायंकाळपासूनच नॉटरिचेबल असल्याची माहिती आहे.

    आमदार संपर्काच्या बाहेर असल्याची कुणकुण लागताच वर्षा बंगल्यावर लागताच सर्व आमदारांची बैठक बोलावण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबई आणि आसपासच्या आमदारांनी तर रात्रीच वर्षावर बंगल्यावर हजेरी लावली. मध्यरात्री दोन वाजेपर्यंत ही बैठक सुरू होती. एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांना संपर्क करण्याचा प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

    मध्यरात्री वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीनंतर शिवसेना आमदारांची आज पुन्हा बैठक बोलवण्यात आली आहे. शिवसेनेतली धुसफूस लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील वर्षा या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. मात्र, आमच्या हितशत्रूचा डाव असल्याचे विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी सांगितले.