shiv sena leader sushma andhare demands that the sit to be appointed in the sheetal mhatre case should be under the jurisdiction of the high court took a visit to dyre family in kalyan nrvb

शीतल म्हात्रे व्हिडिओ व्हायरल प्रकरणी कल्याणमधील ठाकरे गटाच्या विनायक डायरे (Vinayak Dyre UBT) याला दहिसर पोलिसांनी ताब्यात (Dahisar Police Custody) घेतल्यावर शिंदे गटाच्या तीन जणांनी डायरे यांच्या कुटुंबियांना धमकाविले. जीवे मारण्याची धमकी दिली.

कल्याण : शीतल म्हात्रे प्रकरणात (Sheetal Mhatre Viral Video Case) एसआयटीची मागणी (Demand SIT) केली आहे. त्यांनी ही मागणी नक्की करावी. दूध का दूध, पाणी का पाणी झालंच पाहिजे. बिल्कुल याची चौकशी झाली पाहिजे. एसआयटी नेमताना पुलिस भी तुम्हारी, लोक भी तुम्हारे, और जजमेंट भी तुम्हारा ये बात नही चलेगी. या प्रकरणात सन्मानीय उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत असणारी (Jurisdiction of High Court) त्यांच्या सुपरव्हिजन खाली असणारी एसआयटी असली पाहिजे अशी मागणी शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे (The demand has been made by Shiv Sena leader Sushma Andhare).

शीतल म्हात्रे व्हिडिओ व्हायरल प्रकरणी कल्याणमधील ठाकरे गटाच्या विनायक डायरे (Vinayak Dyre UBT) याला दहिसर पोलिसांनी ताब्यात (Dahisar Police Custody) घेतल्यावर शिंदे गटाच्या तीन जणांनी डायरे यांच्या कुटुंबियांना धमकाविले. जीवे मारण्याची धमकी दिली. डायरे यांच्या कुटुंबियांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली (Dyre Family Lodge Complaint In Kolsewadi Police Station) असता पोलिसांनी नावानिशी तक्रार नोंदविली नाही. डायरे कुटुंबीयांची आज शिवसेना नेत्या अंधारे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी ही मागणी केली.

आम्ही चुकीच्या कृतीचे समर्थन करीत नाहीत. अशा एखाद्या घटनेचे निमित्त करुन जर तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना नाहक त्रस दिला जात आहे. प्रकाश सुर्वे या प्रकरणात काहीच बोलत नाहीत. त्यांनी बोलणे फार अपेक्षित आहे कारण त्यांची बहीण शीतल म्हात्रे या त्यांना भाऊ मानतात. बहिणीवर घाणोरडे आरोप होत असताना भावाने पुढे आले पाहिजे. बोलले पाहिजे. मात्र ते का बोलत नाहीत असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

या प्रकरणी तीन मागण्या अंधारे यांनी केल्या आहेत. प्रकाश सुव्रे यांच्या मुलाच्या अकाऊंटवरुन जे लाईव्ह झाले. ते डिलिट झाले. ते सायबरने रिकव्हर केले पाहिजे. व्हिडिओ मॉर्फ आहे तर व्हिडिओ दाखविलाच गेला पाहिजे. जर व्हिडिओ व्हायरल करणे गुन्हा नाही. व्हिडिओ अपलोड करणाऱ्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. त्याच वेळी डायरे कुटुंबियांना संरक्षण मिळाले पाहिजे. सत्ता तुमच्या हाती आहे तर काही करु शकत नाही. गृह मंत्र्यांनी साकल्याने विचार करावा. गृह मंत्री एका पक्षाचे नाहीत. तर महाराष्ट्राचे आहात.

शीतल म्हात्रे यांना फॉलो केले जात आहे याविषयी अंधारे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, याचा अर्थ असा आहे की,गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुचकामी ठरत आहेत. जर एवढय़ा मोठ्या चर्चेत असणाऱ्या व्यक्तीचा पाठलाग होत असेल तर गृह मंत्रालय सपशेल अपयशी ठरलेले आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन त्यांच्याकडून गृहखाते काढून घेतले पाहिजे.