शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांची गाडी फोडली; घटनास्थळी तणावाचे वातावरण

बालाजी कल्याणकर हे अर्धापूर तालुक्यातील देगावमधील कुराड या गावात एका लग्न सभारंभासाठी गेले होते. त्यावेळी काही अज्ञातांनी त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्याची घटना समोर आली आहे.

    नांदेड : नांदेड उत्तर मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांची गाडी फोडल्याची घटना घडली आहे. बालाजी कल्याणकर हे अर्धापूर तालुक्यातील देगावमधील कुराड या गावात एका लग्न सभारंभासाठी गेले होते. त्यावेळी काही अज्ञातांनी त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झालेली नाही.

    बालाजी कल्याणकर आपली कार कार्यक्रम स्थळाजवळ पार्क केली होती आणि ते कार्यक्रमात गेले होते. मात्र काही वेळातच त्यांच्या गाडीवर दगड फेकून त्यांच्या कारची मागची काच फोडण्यात आली. मराठा आंदोलकानी आमदारांच्या कारची काच फोडल्याचं बोललं जात आहे.

    मात्र या घटनेनंतर काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. घटनेची माहिती मिळताच काही वेळात पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. मात्र नेमकं हे कृत्य कुणी केलं हे अद्याप समोर आलेलं नाही.