अकोल्यातील शिवसेनेचे आमदार हरवले; आमदार देशमुखांच्या पत्नीने नोंदवली पोलीस ठाण्यात तक्रार

शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे विधान परिषदि निवडणूक झाल्यापासून नॉट रिचेबल आहेत. तसेच शिवसेनेच्या काही आमदारांचे फाेनही बंद असून, यात बाळापूरचे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांचाही फाेन बंद आहे. सन 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीकडून नितीन देशमुख विजयी झाले हाेते.

    अकोला – एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल झाल्यानंतर आता अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नी प्रांजली देशमुख यांनी अकोला येथील सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात ते हरवल्याची तक्रार नोंदवली आहे. आमदार देशमुख यांचा फोन सकाळपासून स्वीच ऑफ आहे. आ. देशमुख हे जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार आहेत.

    शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे विधान परिषदि निवडणूक झाल्यापासून नॉट रिचेबल आहेत. तसेच शिवसेनेच्या काही आमदारांचे फाेनही बंद असून, यात बाळापूरचे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांचाही फाेन बंद आहे. सन 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीकडून नितीन देशमुख विजयी झाले हाेते. बाळापूर मतदारसंघात शिवसेनेचा पहिला आमदार हाेण्याचा मान देशमुख यांना मिळाला हाेता. देशमुख यांना 69 हजार तर वंचित बहुजन आघाडीने डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर यांना 50 हजार मते मिळाली हाेती.