शिवसेना आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, कुंटुंबावर शोककळा

मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघातील विद्यमान आमदार रमेश लटके कुटुंबियांसह दुबईला गेले होते. तीथेच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचे निधन झालंय. आमदार रमेश लटके यांच्या निधनाची माहीती मिळताच शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी तात्काळ शिवसेनापक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळवली आहे. आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसलांय.

    मुंबई : मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघातील विद्यमान आमदार रमेश लटके कुटुंबियांसह दुबईला गेले होते. तीथेच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचे निधन झालंय. आमदार रमेश लटके यांच्या निधनाची माहीती मिळताच शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी तात्काळ शिवसेनापक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळवली आहे. आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसलांय. आमदार रमेश लटके यांचे पार्थिव मुंबईत आणन्याची तयारी सुरू असून लवकरच त्यांचे पार्थिव मुंबईत आणलं जाईल.

    रमेश लटके हे १९९७ साली मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून गेले. त्यानंतरच्या सन २००२ आणि २००९ च्या महापालिका निवडणुकीत विजयी होत ते महापालिकेत नगरसेवक म्हणून गेले. तर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना बढती मिळाली आणि ते विधानसभेच आमदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर पुढच्याच २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत अंधेरी पूर्वच्या मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा निवडून दिले होते.