निवडणुकीत गुप्ततेचा भंग! संजय राऊतांना धोक्यात आणणाऱ्या कांदेंनी मतपत्रिका बाहेर नेली; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवरही ताशेरे

राज्यसभेसाठी शुक्रवारी पार पडलेल्या निवडणुकीत ज्या हरकती दिल्लीत घेतल्या गेल्या त्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने जो निकाल दिला त्यातून हे स्पष्ट झाले की शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी मतपत्रिका हाताळण्याचे जे पवित्र्य व त्यात जी गुप्तता अपेक्षित आहे ती सांभाळली नाही, म्हणून त्यांचे मत बाद ठरवले गेले, असे स्पष्ट झाले आहे(Shiv Sena MLA Suhas Kande violated the sanctity of handling ballot papers).

  मुंबई : राज्यसभेसाठी शुक्रवारी पार पडलेल्या निवडणुकीत ज्या हरकती दिल्लीत घेतल्या गेल्या त्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने जो निकाल दिला त्यातून हे स्पष्ट झाले की शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी मतपत्रिका हाताळण्याचे जे पवित्र्य व त्यात जी गुप्तता अपेक्षित आहे ती सांभाळली नाही, म्हणून त्यांचे मत बाद ठरवले गेले, असे स्पष्ट झाले आहे(Shiv Sena MLA Suhas Kande violated the sanctity of handling ballot papers).

  राज्यसबेसाटी जरी खुले मतदान असले तरी मतपत्रिका फक्त आणि फक्त पक्षप्रतिनिधींनाच दाखवणे अपेक्षित आहे. तसे नियम व घटना सांगते. अशाच मुद्द्यांवर २००६ मध्ये सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या प्रकरणातही निवडणूक आयोगाने राज्यसभा मतदानासाठी जी प्रक्रिया व नियम ठरवून दिले ते वैध ठरवण्यात आले आहेत.

  सुहास कांदे यांनी शिवसेना प्रतिनिधींसोबतच आपली मतपत्रिका राष्ट्रवादी काँग्रेस प्रतिनिधींनाही दाखवली असा जो आक्षेप भाजपाचे प्रतिनिधी आ. अतुल सावे यांनी घेतला होता तो निवडणूक आयोगाने अंतिमतः ग्राह्य ठरवला व कांदेचे मत बाद झाले.
  पण तसे होताना शिवसेना नेते व पक्षाचे क्रमांक एकचे उमेदवार आणि महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात शरद पवारांच्या बरोबरीने ज्यांनी मेहनत घेतली ते संजय राऊत यांची खासदरकीच धोक्यात आली.

  संजय राऊत यांची जी चरफड सध्या होते आहे त्याचेही कारण कांदेंचा अगोचरपणा हेच आहे. कांदेचे नासिकमधले कडवे विरोधक राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी या घटनेवर टिप्पणी करताना म्हटले की संजय राऊत थोडक्यात वाचले अन्यथा त्यांची सीट धोक्यातच आलेली होती.

  सहा विजयी उमेदवारांमध्ये संजय राऊत यांना सर्वात कमी मते मिळाली आहेत. राऊतांचे मतमूल्य फक्त ४१०० राहिले तर भाजपाचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक हे ४१६५ वर पोचले होते.

  भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर हे दोन मंत्री तर सुहास कांदे हे सेनेचे आमदार यांच्या मतांना हरकती घेतल्या होत्या. या हरकतींची तक्रार घेऊन भाजपाचे उच्चस्तरीय शिष्ठमंडळ दिल्लीत निवडणूक आयोगाकडे सायंकाळी ५.३० वा. पोहोचले. त्यानंतर पाठोपाठ जयंत पाटील, बाळासाहेब थोरात व अनिल देसाई या नेत्यांच्या सह्या असणारी एक तक्रार महाविकास आघाडीने दिल्लीत केली. त्यात मुनगंटीवार व रवी राणा यांच्या विरोधात तक्रार होती.

  नंतर रात्री ९ वाजता नाना पटोले यांनी काँग्रेस पक्षाच्यवतीने आणखी एक निराळी तक्रार मुनगंटीवार आणि रवी राणा यांच्या विरोधात केली. मुळात महाविकास आघाडीने केलेल्या तक्रारीनंतर साधारण तशाच पद्धतीची तक्रार पुन्हा पटोलेंनी का केली असावी हाही प्रश्नच आहे. पण आलेल्या प्रत्येक तक्रारीची दखल घेऊन त्याचा सोक्षमोक्ष लावणे आयोगाला भाग असते. त्यातच आयोगाने या पाचही तमतदानांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग पाहून निर्णय करण्याचे ठरवले.

  रात्री उशिरा विधिमंडळ सचिवालयाने निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भागवत यांच्याकडून ते रेकॉर्डींग प्राप्त करून घेतले. या सर्व प्रक्रियेत पुष्कळ वेळ गेला हे खरे पण भाजपाने तक्रार केली म्हणून निकाल सात आठ तास लांबला हे राऊतांचे म्हणणे तितकेसे खरे नाही, कारण भाजापा नंतर मविआच्या तक्रारी रात्री ९ पर्यंत केल्या गेल्या.

  पक्षप्रतिनिधीला मत दाखवणे होते अपेक्षित

  कांदे यांनी मतदान केल्यानंतर आपली मतपत्रिक घडी करून अन्य कुणाला दिसणार नाही अशा पद्धतीने त्यांच्या पक्षप्रतिनिधीलाच फक्त दाखवणे अपेक्षित होते. कांदे यांनी मतदान करून खुली, घडी न केलेली, मतपत्रिका सर्वांना दिसेल अशा पद्धतीने मिरवत नेली. शिवसेना पक्ष प्रतिनिधींच्या बूथच्या आत जाऊन त्यांनी ती दाखवणे अपेक्षित असताना बाहेरूनच दाखवली व आत या असे सांगूनही ते बहेरच रेंगाळले. शिवाय ते अन्य कोणाशी तरी बोलत आहेत हेही व्हिडिओतून दिसून आले.

  ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची चूक

  या बाबी व्हिडिओमधून स्पष्ट होत असताना त्यांचे मत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मुंबईतच रद्द करणे आवश्यक होते व तसे न करणे ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची चूक ठरते अशा शब्दात विधानमंडळ प्रधान सचिवांवर आयोगाने ताशेरे मारले आहेत. कांदेचे रद्द केलेले मत बाजूला काढून मग सर्व मतमोजणी पूर्ण करण्याचे आदेशही आयोगा रात्री १ वाजता दिले. कांदेंचे मत संजय राऊतांच्याच कोट्यातील असल्यामुले राऊत यंचा मतांच कोटा जेमतेम काठावर पास अशा प्रकारे कमी झाला व ते अडचणीत आले.