भाजपच्या ‘कमळा’वर शिवसेना खासदारांना लढायचीये निवडणूक; तीन राज्यांत मिळालेल्या यशानंतर चित्र

आगामी लोकसभा निवडणूक (Upcoming Loksabha Election) शिंदे गटाचे काही खासदार भाजपच्या कमळ या चिन्हावर लढण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत कमळ फुलले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीतही भाजपाच्या कमळालाच यश मिळेल, असे चित्र आहे.

    मुंबई : आगामी लोकसभा निवडणूक (Upcoming Loksabha Election) शिंदे गटाचे काही खासदार भाजपच्या कमळ या चिन्हावर लढण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत कमळ फुलले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीतही भाजपच्या कमळालाच यश मिळेल, असे चित्र आहे. त्यामुळे धनुष्यबाणाऐवजी कमळ चिन्हावर लढल्यास अधिक फायदा होईल, असे शिंदे गटातल्या काही खासदारांना वाटत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

    शिवसेनेत फूट पडल्यानंतर 18 पैकी 13 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. तेव्हा आगामी लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाचे खासदार काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात घडामोडी सुरू झाल्या आहेत. तसेच तीन राज्यांमधील विधानसभा निवडणुकीतील निकाल भाजपाच्या बाजूने लागले आहेत. त्यामुळे कमळ चिन्हाला अनुकूल वातावरण असल्याची चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर कमळ चिन्हावर निवडणूक लढवली तर मोदी आणि भाजपाच्या यंत्रणेचा फायदा अधिक होऊ शकतो, असे शिंदे गटातील नेत्यांना वाटते.

    शिंदे गटातील काही खासदारांच्या मनामध्ये चलबिचल आहे. पुढील काळात चित्र स्पष्ट होणार असले तरी सध्या शिंदे गटातील अनेक खासदारांना कमळ चिन्हावर निवडणूक लढवणे फायद्याचे असू शकते असे वाटत आहे.