भाजपचा मविआला पुन्हा धक्का, भाजपचे पाचही उमेदवार विजयी

आता भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यामध्ये चुरस बघायला मिळते आहे. मत मोजणी साठीच्या दोन तासांच्या विलंबानंतर विधान परिषदेच्या मतमोजणीला झाली. असून, सर्व २८५आमदारांची मते वैध ठरली आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेचा निकाल काय येतो याची उत्सुकता सर्वांना लागलीय.

    मुंबई – शिवसेनेचे सचिन आहीर आणि आमशा पाडवी यांच्यासह भाजपचे प्रवीण दरेकर, उमा खापरे, राम शिंदे,श्रीकांत भारतीय विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. एकनाथ खडसे, आणि रामराजे नाईक निंबाळकर यांचाही विजय झाला आहे. तर काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे विजयी झाले आहेत. तर काँग्रेसचे भाई जगताप यांचा पराभव झाला आहे.

    या निवडणुकीत भाजपाचे पाचही उमेदवार जिंकल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. कारण या निवडणुकीत भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांच्यातच लढत झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र भाई जगताप यांना पराभवाचा सामना करावा लागल्याने काँग्रेसला झटका बसला आहे.

    विधान परिषदेसाठीचे दुपारी पावणेचार वाजेपर्यंत २८५आमदारांनी मतदान केले. काँग्रेसने भाजप उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर आक्षेप घेतला होता. त्यामुळे मतमोजणी रखडली होती. मात्र, आधी राज्य निवडणूक आयोग आणि त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने काँग्रेसचे आक्षेप फेटाळले. मात्र, त्यामुळे मतमोजणी दोन तास रखडली.