बिग ब्रेकींग! शिवसेना आमदार अपात्रप्रकरणी सुनावणीसाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ

    MLAs Disqualification Petition : शिवसेना आमदार अपात्रप्रकरणी निर्णय देण्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे वेळ वाढवून मागितली होती. त्यांची ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे.

    शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निर्णय देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. मात्र या मुदतीमध्ये निर्णय देणे अवघड असल्याचे सांगून राहुल नार्वेकर यांनी ही मुदत वाढवून द्यावी, अशी विनंती केली होती. ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली असून आता १० जानेवारीपर्यंतचा वेळ दिला आहे.