शिवसेनेला बंड काही नवीन नाही; संजय राऊतांचे वक्तव्य

शिवसेनेत यायचे शिवसेनेचे संरक्षण घ्यायचे, संपत्ती कमवायची आणि त्याच पैशांनी शिवसेनेवर वार करायचे. मी कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना म्हणालो की, ही घाण आता परत पक्षात घेऊ नका. त्यासाठी दहिसरला एक वेगळा डंपिंग ग्राऊंड तयार करा.

    मुंबई – शिवसेनेने आम्हाला एक वेगळी ओळख दिली असून, आम्हाला पाहिल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा आपला रस्ता बदलतात, कोणाचीही हिम्मत नाही शिवसेनेच्या नादाला लागायची कारण, शिवसैनिक झेंडा खिशात ठेऊन वेळ आल्यावर दांडा हातात घेतो, भाजपला महाराष्ट्र तोडायचा असून, शिवसेनेला बंड काही नवीन नाही, असे टीकास्त्र शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर सोडले आहे. मुंबईतील दहिसर येथे आज शिवसेनेचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, त्या कार्यक्रमात राऊत बोलत होते.

    पुढे ते म्हणाले की, शिवसेनेत यायचे शिवसेनेचे संरक्षण घ्यायचे, संपत्ती कमवायची आणि त्याच पैशांनी शिवसेनेवर वार करायचे. मी कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना म्हणालो की, ही घाण आता परत पक्षात घेऊ नका. त्यासाठी दहिसरला एक वेगळा डंपिंग ग्राऊंड तयार करा. हे आता किती काळ सहन करायचे बाहेरून येणार आम्हाला शिवसेना काय ते शिकवतात.