लष्करेंमुळेच तालुक्यात शिवसेनेचे भगवे वादळ उभे : जगताप

धर्मवीर स्व.अण्णाभाऊ लष्करे यांनी शिवसेनेचे भगवे वादळ तालुक्यात मजबूत केलेले आहे. शिवसेनेचा पंचायत समिती सदस्य होण्याचा बहुमान स्व.लष्करे यांनी मिळविलेला होता. जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी ते अहोरात्र कष्ट घेत असल्यामुळेच स्व. अण्णाभाऊ लष्करे यांचे नाव उभ्या महाराष्टाला सुपरित आहे.

    नेवासा : धर्मवीर स्व.अण्णाभाऊ लष्करे यांनी शिवसेनेचे भगवे वादळ तालुक्यात मजबूत केलेले आहे. शिवसेनेचा पंचायत समिती सदस्य होण्याचा बहुमान स्व.लष्करे यांनी मिळविलेला होता. जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी ते अहोरात्र कष्ट घेत असल्यामुळेच स्व. अण्णाभाऊ लष्करे यांचे नाव उभ्या महाराष्टाला सुपरित आहे.

    युवकांचे मोठे संघटन त्यांनी उभे केल्यामुळे तालुक्यात भगवे वादळ उभे राहीलेले आहे, त्यामुळे स्व.लष्करे यांचे नांव आजही तालुक्यासह राज्यात आदराने घेतले जातेे,असे प्रतिपादन शिवसेनेचे शहर प्रमुख नितीन जगताप यांनी व्यक्त केले.

    धर्मवीर स्व.अण्णाभाऊ लष्करे यांचे अकरावे पुण्यस्मरण कार्यक्रम नेवासा शहरातील उपनगर असलेल्या संभाजीनगर येथे शहर शिवसेना व संभाजीराजे युवा मंचच्या वतीने वाजता साजरे करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना नेते रामदास गोल्हार, शहर शिवसेना प्रमुख नितीन जगताप, शिवसेनेचे युवानेते नारायण लष्करे, विजय पिटेकर, अनिल धनवटे यावेळी उपस्थित होते.

    यावेळी विकास पिटेकर, शिवराज पिटेकर, गणेश मोहिते, मोहन पवार, ऋषिकेश लष्करे, आदेश कदम, बंटी धनवटे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे संयोजक विकास लष्करे व देवा लष्करेंने आदी उपस्थित होते.