मराठी पाट्यांवरून शिवसेना शिंदे गट आक्रमक, कारवाईसाठी उपजिल्हाप्रमुखांच्या संबंधित अधिकाऱ्याला फोन

राज्यातील सर्व दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत २५ नोव्हेंबर रोजी संपली. त्यानंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेत ठिकठिकाणी आंदोलने केली.

    डोंबिवली : मराठी भाषेत नाम फलक न लावणाऱ्या दुकानदारांविरोधात मुंबई महापालिकेने कारवाई सुरू केली. कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक दुकानांवर आजही इंग्रजी किंवा इतर भाषांमध्ये नामफलक दिसून येत आहेत. काही दुकानदार छोट्या अक्षरात एका कोपऱ्यात मराठी नाव लिहून ते पूर्ण करत आहेत. मुदतीनंतर ही मराठी नामफलक न लावणाऱ्या दुकानदारांवर कारवाईसाठी अद्यापही महापालिका तसेच संबंधित यंत्रणेला मुहूर्त मिळालेला नाही याबाबत आज शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी व्यवसाय व दुकाने आस्थपणा नोंदनी विभागाच्या उपायुक्तांना फोन करून खडे बोल सूनाववले. न्यायालयाच्या आदेशानंतर हे अद्याप कल्याण डोंबिवलीत कारवाई सुरू केली नाही, तुम्हाला आंदोलनाची भाषा समजते का असा संतप्त सवाल त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारला.

    राज्यातील सर्व दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत २५ नोव्हेंबर रोजी संपली. त्यानंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेत ठिकठिकाणी आंदोलने केली. मुंबई महापालिका क्षेत्रात मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदाराविरोधात कारवाई सुरू केली आहे. तर दुसरीकडे कल्याण डोंबिवलीमध्ये मात्र कारवाईसाठी मुहूर्त मिळालेला नाही. याबाबत केडीएमसीने मराठी भाषेत नाम फलक लावण्यासाठी संबंधित दुकानदारांना वारंवार आवाहन केल्याचे सांगितले तर कारवाईचे अधिकार व्यवसाय व दुकाने आस्थपणा नोंदनी विभागाकडे असल्याचं केडीएमसीने स्पष्ट केलं.

    याबाबत शिवसेना शिंदे गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी आज व्यवसाय व दुकाने स्थापना नोंदणी विभागाचे संबंधित अधिकारी साकेत कानडे यांना फोन करत चांगलेच धारेवर धरले. संबंधित अधिकाऱ्याने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने संतापलेल्या कदम यांनी महाराष्ट्रात मराठी पाट्या असाव्यात असं वाटत नाही का? तुम्हाला आंदोलनाचीच भाषा समजते का असा संतप्त सवाल केला.