दांडियावरून शिवसेना- शिंदे गटात जुंपली; आशिष शेलारांचा पत्रकातून ठाकरेंना टोला

गिरणगावात म्हणजे लालबाग, परळ, शिवडीमध्ये भाजपने मराठी दांडिया आयोजित केला. त्याचा त्रास सामनाकारांना आणि पेंग्विन सेनेला एवढा का झाला? अर्थात याकूबच्या कबरीचे सुशोभीकरण करणाऱ्यांना मराठी दांडियाचा त्रास होणारच, अशी टीकाही भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे.

    मुंबई : दहिहंडी, गणेशोत्सावातील राजकीय स्पर्धेनंतर आता नवरात्रीमध्येही (Navaratri) शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गट यांच्यात स्पर्धा दिसून येत आहे. दोन्ही गट एकमेकांना पेचात पकडण्याची संधी शोधत असतात. त्यातच मराठी सण-उत्सव साजरे केल्याने पेंग्विन सेनेला एवढा त्रास का, असा सवाल भाजप नेते आशिष शेलारांनी (Aashish Shelar) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना केला आहे.

    गिरणगावात (Girangaon) म्हणजे लालबाग, परळ, शिवडीमध्ये भाजपने मराठी दांडिया (Marathi Dandia) आयोजित केला. त्याचा त्रास सामनाकारांना आणि पेंग्विन सेनेला एवढा का झाला? अर्थात याकूबच्या कबरीचे सुशोभीकरण करणाऱ्यांना मराठी दांडियाचा त्रास होणारच, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

    शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपवर दांडियावरून टीकास्त्र डागण्यात आले आहे. यावर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. ते म्हणाले की, शिवसेनेला जळजळ मळमळ होत असेल तर, मग घ्या ना धौती योग, असे म्हणताना एक पत्र काढत रोखठोक टीका केली आहे.