गोवारी यांची शिवसेना उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांची कामोठे शहर अध्यक्ष पदी निवड

मावळ लोकसभा मतदार संघाच्या अनुषंगाने महत्वाच्या असलेल्या कामोठे वसाहतीत शिवसेनेला (उद्धव ठाकरे) मानणारा मोठा वर्ग आहे.

    पनवेल : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेनेच्या (उबाठा) गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये काही फेरबदल करण्यात आले आहेत. कामोठे शहर अध्यक्ष पदावर रामदास गोवारी यांची निवड ठाकरे गटा कडून करण्यात आली असून, सेना नेते उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार त्या आशयाचे पत्र जिल्हाध्यक्ष शिरीष घरत यांनी गोवारी यांना दिले आहे. मावळ लोकसभा मतदार संघाच्या अनुषंगाने महत्वाच्या असलेल्या कामोठे वसाहतीत शिवसेनेला (उद्धव ठाकरे) मानणारा मोठा वर्ग आहे.

    मूळचे मुंबई येथून कामोठे वसाहतीत स्थलांतरीत झालेल्या या वर्गाला आपल्याकडे खेचण्यासाठी सर्व पक्ष प्रयत्न करत आहेत. त्याच अनुषंगाने सर्व समावेशक आश्वासक असा चेहरा देण्याचा प्रयत्न शिवसेना उबाठा गटाने केला. सेनेशी कायमच एकनिष्ठ राहिलेल्या रामदास गोवारी यांच्या खांद्यावर शहर अध्यक्ष पदाची जवाबदारी देत कामोठे वसाहतीत महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या पारड्यात जास्तीत जास्त मतदान पाडून घेण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी कडून केला आहे. अशी चर्चा सर्वसामान्य सैनिकांमध्ये आहे. दरम्यान गोवारी यांना सेने कडून शहर अध्यक्ष पदाची जवाबदारी देण्यात आल्याने त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.