udhav thackrey

भाजपा आपल्या ताकदीवर उमेदवार निवडून आणू शकत नाहीय. यामुळे अपक्ष आणि अन्य पक्षांच्या जिवावरच सारी भिस्त आहे. तसेच घोडेबाजार होण्याची शक्यता नाकारत येऊ शकत नाहीय तसेच दगाफटका होऊ नये म्हणून शिवसेना सतर्क झाली आहे. राज्यसभेला दगाफटका झाल्याचा आरोप करणाऱ्या शिवसेनेने आपल्या आमदारांना ट्रायडंट सोडून दुसऱ्याच हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

    मुंबई : मागील आवड्यात राज्यसभा निवडणुका (Rajya sabha election) झाल्यानंतर आता राजकीय पक्षांनी विधान परिषद निवडणुकीच्या (MLC Election 2022) तयारीला लागले आहेत. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात उतरल्याने 20 जूनला निवडणुकीचा (MLC Election on 20 June 2022) आखाडा रंगणार आहे. दहाव्या जागेसाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये (Congress and BJP) लढत रंगणार असून क्रॉस व्होटिंगचा (Cross Voting) तसेच घोडबाजार किंवा दगाफटका होऊ नये, यासाठी सर्वंच पक्षांनी सावध भूमिका घेतली आहे.

    भाजपने आमदारांना (BJP MLA) दोन दिवस ताज हॉटेलचा (Taj Hotel) पाहुणचार घडविण्याचे निश्चित केले आहे. याची पूर्ण जबाबदारी आमदार आशीष शेलार, गिरीश महाजन आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (MLA Ashish Shelar, Girish Mahajan and Leader of Opposition in the Legislative Council Praveen Darekar) यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळं भाजपाकडून राज्यसभेप्रमाणे रणनिती आखली जात असून, भाजपाच्या गोटात हालचालीना वेग आला आहे. या या पार्श्वभूमीवर दगाफटका होऊ नये म्हणून शिवसेनेने आपल्या आमदारांना दोन दिवसांत रेनेसॉमध्ये बोलविले आहे. राज्यसभा निवडणुकी वेळी शिवसेना आमदारांना ट्रायडंट हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं

    दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. भाजपा आपल्या ताकदीवर उमेदवार निवडून आणू शकत नाहीय. यामुळे अपक्ष आणि अन्य पक्षांच्या जिवावरच सारी भिस्त आहे. तसेच घोडेबाजार होण्याची शक्यता नाकारत येऊ शकत नाहीय तसेच दगाफटका होऊ नये म्हणून शिवसेना सतर्क झाली आहे. राज्यसभेला दगाफटका झाल्याचा आरोप करणाऱ्या शिवसेनेने आपल्या आमदारांना ट्रायडंट सोडून दुसऱ्याच हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी  १८ जूनपासूनच आपल्या आमदारांना हॉटेलवर राहण्य़ास येण्याचे आदेश दिले आहेत. (Uddhav Thackeray 18 June all MLA order) आपल्या आमदारांना दोन दिवसांत रेनेसॉमध्ये बोलविले आहे. तसेच दोन दिवस आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.