शिवसेना कुणापुढे झुकणार नाही, वाकणार नाही; संजय राऊतांचा विरोधकांवर हल्लाबोल

शिवसेनेच्या महासभेत खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर सडकून टीका केलीय. शिवसेना कुणापुढे झुकणार नाही, वाकणार नाही. या विराट अतिविराट शिवसेनेच्या सभेत उपस्थित सर्व शिवसैनिकांनी हनुमान चालीसा वाचली तर चिनचं लढाखमधील सैन्य पळून जातील. असं म्हणत राऊत यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

  मुंबई : शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून शिवसंपर्क अभियनाची सभा मुंबईच्या बीकेसी मैदानात घेतली आहे. विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेण्यासाठी शिवसेनेनं पोस्टर आणि व्हिडिओ टीझरद्वारे विरोधकांवर तोफ डागली आहे. शिवसेनेकडून आक्रमक टीझरही प्रदर्शीत करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर हजारोंच्या संख्येत शिवसैनिक बीकेसी मैदानावर पोहोचले आहेत. शिवसेनेनं शिवाजी पार्क ते बीकेसी मैदानापर्यंत बाईक रॅलीही काढली आहे. बाईक रॅलीत हनुमान रथ सजवण्यात आला असून हिंदुत्व काय असतं हे शिवसैनिक रॅलीच्या माध्यमातून दाखवत आहेत.

  दरम्यान, शिवसेनेच्या महासभेत खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर सडकून टीका केलीय. शिवसेना कुणापुढे झुकणार नाही, वाकणार नाही. या विराट अतिविराट शिवसेनेच्या सभेत उपस्थित सर्व शिवसैनिकांनी हनुमान चालीसा वाचली तर चिनचं लढाखमधील सैन्य पळून जातील. असं म्हणत राऊत यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

  राऊत नेमकं काय म्हणाले? 

  अकबरुद्दीन शिवसेनेच्या तोफा नेहमी धडाडत असतात. आपले मुख्यमंत्री फार मोठा दारुगोळा घेवून मंचावर येणार आहे. आजची शिवसेनेची सभा ही १०० सभांची बाप असेल. मुंबईचा बाप फक्त शिवसेना. कुणाला पाहायचं असेल तर अजमावून पाहा. आमचा बाप एकच हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे. शिवसेना कुणापुढे झुकणार नाही, वाकणार नाही. संघर्षाशिवाय विजय कुचकामी आहे. संघर्षापूढे विजय आहे. शिवसेनेचे हिंदुत्व छत्रपती संभाजी महाराजांसारखे आहे. संजय राऊतांनी अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर टीका केली आहे. ओवेसींचा धिक्कार करतो. २०१४ पासून ओवेसी महाराष्ट्रात येत आहे, तेव्हा तुम्ही का नाही रोखले. अनेक वेळा ओवेसी औरंगजेबासमोर नतमस्तक झाले आहेत, तेव्हा तुम्ही झोपले होते का?

  अकबरुद्दीन ओवेसीनं औरंगजेबाच्या कबरीपुढं गु़डघे टेकले. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अपमान. फडणवीसांच्या काळात २० वेळा औवेसी कबरीपर्यंत गेला. तुम्ही त्याला रोखायला पाहिजे होता. औरंगजैबाला आम्ही गाडलं आहे. गुजरातमध्ये औरंगजेब जन्माल आला, म्हणून महाराष्ट्रवर आक्रमण. आणि शिवाजी महाराज महाराष्ट्रात. गेल्या तीन महिन्यात २७ काश्मीरी पंडितांच्या हत्या. राहुल भटला अतिरेक्यांनी गोळ्या घातल्या.

  पंडितांनी आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. महाराष्ट्राचा सह्याद्री हिमालयाच्या बरोबरीनं उभा राहील. १० जूनला निवडणूक असल्याने १५ जूनला शिवसेनेचा अयोध्या दौरा होणार आहे. काश्मीरमधला हिंदू सगळ्यात जास्त खतरेमे आहे. राहुल भट्ट यांची हत्या करण्यात आली. या हत्येचा निषेश करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या काश्मिरी पंडीतांवर अश्रुच्या नळकांड्या टाकण्यात आल्या. कोणामुळे हिंदुत्व धोक्यात आले आहे ते तुम्ही ठरवा.