मराठा आरक्षणाबाबत शिवसेनचं राष्ट्रपतींना पत्र, संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची केली मागणी!

उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी केली आणि केंद्राकडून हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो, असे सांगितले.

    शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ( President Draupadi Murmu) यांना पत्र लिहून त्यांना भेटण्यासाठी वेळ मागितला असून मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. हे पत्र 31 ऑक्टोबर रोजी लिहिण्यात आले आहे.

    शिवसेनेचे ठाकरे गटीच् राज्यसभा सदस्य संजय राऊत यांच्या नेतृत्वाखालील ११ सदस्यीय शिष्टमंडळ ५ किंवा ६ नोव्हेंबरला राष्ट्रपतींना भेटू इच्छित असल्याचे पत्रात म्हटले आहे. मराठा इतर मागासवर्गीय प्रवर्गातील सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षणाची मागणी करत आहेत, तर धनगर समाजाला एसटी (अनुसूचित जमाती) दर्जा हवा आहे.

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी केली आणि केंद्राकडून हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो, असे सांगितले. महाराष्ट्रातील सर्व केंद्रीय मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करावा, असे ते म्हणाले. मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण न झाल्यास केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.