एक घर, एक पद! नाराजीनाट्य थोपवण्यासाठी शिवसेनेचा नवा फॉर्म्युला

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने हालचाली सुरू केल्या आहेत. प्रभाररचना कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे राजकीय पक्षदेखील सक्रीय झाले आहेत. पालिका निवडणुकांची तयारी करण्यासाठी बैठकांनाही जोर चढला आहे. रत्नागिरीत शिवसेनेनेही माजी नगरसेवक आणि इच्छुकांची तातडीची बैठक घेऊन राजकीय रणनीती ठरवण्यात आली(Shiv Sena's new formula to stop resentment).

    मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने हालचाली सुरू केल्या आहेत. प्रभाररचना कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे राजकीय पक्षदेखील सक्रीय झाले आहेत. पालिका निवडणुकांची तयारी करण्यासाठी बैठकांनाही जोर चढला आहे. रत्नागिरीत शिवसेनेनेही माजी नगरसेवक आणि इच्छुकांची तातडीची बैठक घेऊन राजकीय रणनीती ठरवण्यात आली(Shiv Sena’s new Formula to stop resentment).

    शिवसेनेत इच्छुकांची घाऊकगर्दी असल्याने नाराजी उफाळण्याची शक्यता अधिक आहे. नाराजी थोपवण्यासाठी एका घरात एकच पद देण्याचा फॉर्मुल्या शिवसेनेने या निवडणुकीत राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी दुजोरा दिला.

    राज्य निवडणूक आयोगाने प्रभाररचना कार्यक्रम जाहीर केला आहे. 14 तारखेपर्यंत यावर हरकती मागविण्यात येणार आहे. त्यावर सुनावणी होऊन 7 जूनला अंतिम प्रभागरचना जाहीर होणार आहे. त्यामुळे लांबणीवर पडलेल्या निवडणुका कधीही होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

    आयोगाच्या निर्णयानंतर निर्धास्त असलेले राजकीय पक्ष जागे झाले आहेत. निवडणुका कधीही लागणार असल्याने माजी नगरसेवक आणि इच्छुकांच्या बैठका सुरू झाल्या आहेत.

    शहरामध्ये शिवसेनेची ताकद अधिक असल्याने 30 पैकी 19 म्हणजे सर्वांत जास्त नगरसेवक सेनेचे होते. त्या खालोखाल, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आहे. प्रत्येकी 6 सदस्य होते; आता प्रभागरचनेमध्ये सदस्यसंख्या वाढून 32 झाली आहे. त्यामुळे काही प्रभागातील भाग बाजूला करून त्याचा नवीन 1 प्रभाग तयार केला आहे.