शिवसेनेचं राज्यव्यापी अधिवेशन २२ आणि २३ जानेवारीला नाशिकला होणार, संजय राऊतांची माहिती!

अयोध्येतील राम मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शिवसेना नाशिकला काळाराम मंदिरामध्ये दर्शन, पूजा त्यानंतर गोदावरीवर महारथी असा एक २२ तारखेचा कार्यक्रम करणार आहे.

    मुंबई : शिवसेनेचे  (shivsena) राज्यव्यापी अधिवेशन 22 आणि 23 तारखेला नाशिक येथे होणार  आहे.  प्रत्यक्ष अधिवेशन २३ तारखेला सुरु होईल. अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी शनिवारी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिली. अयोध्येतील राम मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शिवसेना नाशिकला काळाराम मंदिरामध्ये दर्शन, पूजा करण्यात येणार असल्याचही त्यांनी सांगितलं.

    22 तारखेला. साडेपाच वाजता उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात जातील. सात वाजता त्यांचे गोदातिरावर आगमन होईल आणि तिकडे आरती होईल. त्या आरतीसाठी नाशिकसह आसपासच्या परिसरातले नागरिक उपस्थित राहतील. त्याआधी दीड वाजता उद्धव ठाकरे ओझर विमानतळावर उतरून थेट भगूरला जातील. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या निवासस्थानी किंवा स्मारकाला तिथे भेट देतील.तो दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण नाशिकला आलो आणि वीर सावरकरांचा स्मरण झालं नाही, हे आमच्याकडून होणार नाही. २३ तारखेला डेमोक्रसी क्लब नाशिक तिथे अनेक राजकीय ठराव केले जातील. राज्यभरातून आलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले जाईल आणि साधारण शिवसेनेच्या वाटचालीची पुढची दिशा ठरवली जाईल. अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.