मोदींच्या भाषणात शिवस्मारकाचा उल्लेख नाही, मविआनंतर आता शिंदे-फडणवीस सरकारलाही शिवस्मारकाचा विसर? अमोल मिटकरींचे ट्विट करत मोदींवर टिका

शिवस्मारकाचे भूमिपूजन होऊन ९ वर्षे झाली तरी अद्यापर्यंत या कामाचे पुढे काय झाले यावर मात्र मविआ सरकारप्रमाणेच तसेच आता शिंदे-फडणवीस सरकारला याचा विसर पडला का, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.

    मुंबई- गुरुवारी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) मुंबईतील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. दरम्यान, हा कार्यक्रम मोठ्याने तसेच भव्य दिव्य असा साजरा करण्यात आला. दरम्यान, सर्व विकासकामांचे मोदींनी लोकार्पण व भूमिपूजन केल्यानंतर आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करत, विविध विकासकामे आगामी काळात मुंबईत दिसतील, असं म्हणत शिंदे-फडणवीसांचे कौतूक केले. मात्र मोदींच्या संपूर्ण भाषणात शिवस्मारकाचा उल्लेखच नसल्यामुळं शिवप्रेमीकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी देखील शिवस्मारक यावर काहीच बोलले नाहीत.

    मविआप्रमाणे शिंदे-फडणवीस सरकारला शिवस्मारकाचा विसर

    एकिकडे २०१४ साली मोदी पंतप्रधान असते वेळी मुंबतील अरबी समुद्रात शिवस्मारकाचे मोठ्या थाटात भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानतर आता याला नऊ वर्ष झाली तरी शिवस्मारकाचे काम कुठपर्यंत आलेय? किंवा शिवस्मारकाचे काय झाले? याबाबत कोणाकडून काही उत्तर मिळाले नाही. शिवस्मारकाचे भूमिपूजन होऊन ९ वर्षे झाली तरी अद्यापर्यंत या कामाचे पुढे काय झाले यावर मात्र मविआ सरकारप्रमाणेच तसेच आता शिंदे-फडणवीस सरकारला याचा विसर पडला का, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.

    विरोधकांची टिका…

    दरम्यान, एकिकडे मोदींनीं संपूर्ण भाषणात शिवस्मारकाचा उल्लेख केलाचा नाही, तर शिंदे व फडणवीस यांच्या देखील भाषणात शिवस्मारकाचा उल्लेख आला नाही, त्यामुळं यावर विरोधकांनी टिका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत यावरुन शिंदे-फडणवीस व मोदींवर निशाना साधला आहे. “निर्धार मुंबईच्या विकासाचा… फोटो आठवा मोदीजींचा! #२०१६ ते २०२३ … वेलकम मोदीजी” असं ट्विट मिटकरी यांनी करत शिवस्मारकावरुन भाजपावर टिका केली आहे. तसेच शिवप्रेमी यांच्याकडून देखील शिवस्मारकावरुन शिंदे-फडणवीस तसेच मोदींवर टिका केली जात आहे.