maval news
maval news

  वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील कान्हे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील आंबेवाडी येथे शिवाजी महाराजांचा बारा फूट उंचीचा पुतळा तसेच सभागृह, तळे सुशोभीकरण असे प्रेरणादायी शिवस्मारक साकारले जात आहे. कान्हे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील आंबेवाडीतसुद्धा विविध विकासकामे होणार असून, या कार्यक्रमाचे भूमिपूजन मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

  युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित

  या कार्यक्रमप्रसंगी किशोर पं. सातकर, संदीप आंद्रे, प्रकाश आगळमे, सुजाता चोपडे, गिरीश सातकर, महेश सातकर, अश्विनी शिंदे, आशा सातकर, रुपाली कुटे, मनीषा ओव्हाळ, सोपान ज्ञानेश्वर धिंदळे, किशोर सातकर, सोनाली सातकर, बाबाजी चोपडे, संदीप नामदेव ओव्हाळ, आरिफ मुलाणी, रोहिणी चोपडे, पूजा चोपडे ग्रामविकास अधिकारी संतोष शिंदेसह ग्रामस्थ, महिला भगिनी, युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  सर्वसामान्य नागरिकांना उपयोगी असे सभागृह

  त्याचबरोबर कान्हे ग्रामस्थांच्या मागणीनुसार भविष्यकाळामध्ये सर्वसामान्य नागरिकांना उपयोगी असे सभागृह, जिम,महिला योगा सेंटर व सार्वत्रिक कार्यक्रमांच्या उद्देशाने 350 ते 400 लोक बसतील अशा प्रशस्त हॉलचे महिलांना प्रशिक्षणासाठी, इतर सर्व प्रकारचे ट्रेनिंगसाठी, विवाह सोहळा व वाढदिवसाच्या सार्वजनिक वापरासाठी एक अद्ययावत सभागृह मौजे कान्हे–आंबेवाडी येथे उभारण्यात येणार आहे.

  तीन एकर जागा ग्रामपंचायतीस बक्षीसपत्र

  आंबेवाडी येथील सिद्धिविनायक सोसायटीमधील अंबादास पाचपोर यांनी तीन एकर जागा ग्रामपंचायतीस बक्षीसपत्र करून, 7/12 ग्रामपंचायतीच्या नावे करून दिला आहे. यासाठी सरपंच विजय वामन सातकर, सदस्य किशोर प्रभाकर सातकर व भाऊ शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले आहे. त्याबद्दल सरपंच विजय वामन सातकर व ग्रामपंचायत कान्हे यांच्या वतीने अंबादास पाचपोर यांचा सन्मान व आभार व्यक्त केले.