
राज्यभर शिवराज्याभिषेक (Shiva Rajabhishek) दिनाचा उत्साह आहे. रायगडवर (Raigad) या निमित्ताने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी रायगडावर विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
रायगड – आज तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा राज्यभर साजरा केला जात आहे. तिथीनुसार मागील दोन तारखेपासून रायगडावर शिवराज्याभिषेक साजरा होत आहे. राज्यभर शिवराज्याभिषेक (Shiva Rajabhishek) दिनाचा उत्साह आहे. रायगडवर (Raigad) या निमित्ताने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी रायगडावर विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर कोल्हापुरातील (Kolhapur) नवीन राजवाड्यावर शाहू महाराजांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे.
कोल्हापुरात, पुण्यात शिवराज्याभिषेक सोहळा…
दरम्यान, दुसरीकडे कोल्हापुरात नवीन राजवाड्यावर शाहू महाराज यांच्या हस्ते शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे. शाहू महाराजांचे पुत्र संभाजी राजे हे रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करणार आहेत. तर त्यांचे वडील शाहू महाराज यांनी कोल्हापुरात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं कोल्हापूरकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तर पुण्यात अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती आणि संभाजी ब्रिगेडकडून पुण्यातील लाल महालात आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित रहाणार आहेत.
कसा असणार रायगडावर दिवसभर शिवराज्याभिषेक सोहळा
सकाळी 7 वाजता – युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांचे शुभहस्ते ध्वजपूजन.
सकाळी 7.30 वाजता – शाहिरी कार्यक्रम.
सकाळी 9.30 वाजता – छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे आगमन.
सकाळी 9.50 वाजता – संभाजी छत्रपती संभाजी महाराज आणि शहाजीराजे छत्रपती यांचे स्वागत.
सकाळी 10.10 वाजता – छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते शिवाजी महाराजांना अभिषेक.
सकाळी 10.20 वाजता – शिवाजी महाराजांना सुवर्ण नाण्यांचा अभिषेक.
सकाळी 10.30 वाजता – छत्रपती संभाजी महाराज यांचे शिवभक्तांना संबोधन.
सकाळी 11 वाजता – शिवाजी महाराजांची पालखी जगदीश्वराच्या दर्शनासाठी जाईल.
दुपारी 12.10 वाजता – शिवाजी महाराजांच्या समाधीस अभिवादन.