शिवाजी पार्क म्हटलं की शिवसेनाचं, दसरा मेळाव्यावरुन शरद पवार यांची प्रतिक्रिया

शिवसेनेची ओळख असणारा शिवाजी पार्कवर होणारा पारंपरिक दसरा मेळावा (Dasara Melava) कोणाचा आणि कुठे होणार? याबाबद सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. यावरुन शिवसेना व शिंदे गट हे दोघेही न्यायालयात गेले असताना, आता यावर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठ वक्तव्य केलं आहे.

    मुंबई: शिंदे गटानं (Shinde group) केलेल्या बंडामुळं शिवसेनेत (Shivsena) फुटी पडली. परिणामी राज्यात सत्तांतर झालं आणि ठाकरे आणि शिंदे गट (Thackeray and shinde) अशी शिवसेनेची विभागणी झाली. दरम्यान, शिवसेनेची ओळख असणारा शिवाजी पार्कवर होणारा पारंपरिक दसरा मेळावा (Dasara Melava) कोणाचा आणि कुठे होणार? याबाबद सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. यावरुन शिवसेना व शिंदे गट हे दोघेही न्यायालयात गेले असताना, आता यावर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठ वक्तव्य केलं आहे.

    दरम्यान, मागील पन्नास वर्षापेक्षा अधिक काळ शिवसेना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा साजरा करत आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी यांनी जेव्हापासून शिवसेनेची स्थापना केली, तेव्हापासून शिवसेना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा साजरा करत आहे. शिवाजी पार्क म्हटलं की, शिवसेनाचं हे समीकरण आहे. शिवसेनेची स्थापना शिवाजी पार्कवर झाली त्यामुळं शिवाजी पार्क व शिवसेना यांचं एकप्रकारे अतुट नातं आहे. त्यामुळं शिवाजी पार्कवर दसरा मेळावा साजरा करण्याचा अधिकार फक्त उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाच आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी म्हटलं आहे, त्यामुळं पवार यांच्या प्रतिक्रियेनंतर शिंदे गटातून यावर कोण उत्तर देते का? हे पाहावे लागेल.