शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र; ठाकरे व वंचितच्या युतीची आज घोषणा होणार? दुपारी संयुक्त पत्रकार परिषद; मविआ नेत्यांती दांडी, कारण…

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर दोघेही संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या युतीची घोषणा करणार आहेत. तसेच जागा वाटपावरही हे दोन्ही नेते भाष्य करण्याची चिन्हे असल्याचं सांगितलं जातं.

    मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणाचा आजपासून नवा अध्याय सुरू होणार आहे. कारण राज्यात शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळं आगामी काळात राज्याच्या राजकारणातील नवी समीकरणं पाहयला मिळणार आहेत. आज ठाकरे गट (Thackeray) व वंचित (Vanchit) यांची संयुक्त पत्रकार परिषद (PC) होणार आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या युतीची घोषणा होणार असल्याचं ट्विट केलं आहे. शिवशक्ती आणि भीमशक्तीचा एल्गार, संयुक्त पत्रकार परिषद. 23 जानेवारी दुपारी 12.30 वाजता. आंबेडकर भवन, नायगाव, दादर… महाराष्ट्राच्या राजकारणातील नवे पर्व… असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. त्यामुळं आज युती होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    उद्धव ठाकरे पहिल्यांदाच आंबेडकर भवनात…

    दरम्यान, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर दोघेही संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या युतीची घोषणा करणार आहेत. तसेच जागा वाटपावरही हे दोन्ही नेते भाष्य करण्याची चिन्हे असल्याचं सांगितलं जातं. तसेच या युतीच्या घोषणेवेळी महाविकास आघाडीतील इतर मित्र पक्षाचे नेते नसतील, अशी माहिती आहे. परंतू या युतीची घोषणा दादरच्या आंबेडकर भवनात केली जाणार आहे. आंबेडकर भवनात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्ताने उद्धव ठाकरे पहिल्यांदाच आंबेडकर भवनात येणार आहेत.

    राजकीय समीकरणं बदलणार…

    या युतीच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र येणार आहेत. तसेच महाराष्ट्राच्या राजकारणात या युतीचे दूरगामी सामाजिक परिणाम होणार आहेत. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीला नवा भिडू मिळणार तर आहेच, परंतु, आंबेडकर आणि ठाकरे यांच्या युतीने केवळ राजकीय समीकरणेच बदलतील असं नव्हे तर सामाजिक समीकरणेही बदलणार आहेत. आंबडेकर यांच्याशी युती केल्याने ठाकरे यांचं राजकारण बदलणार आहे. त्यामुळं आता शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र दिसणार आहे.