मागासर्गीय बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी कुठेही कमी पडणार नाही : शिवेंद्रसिंहराजे

ज्या घराण्याचा वारसा आम्ही चालवतो. त्या घराण्याने कधीही जातीभेद केला नाही. मी तर जात-पात, धर्म- पंथ असा भेदभाव कधीही मानला नाही आणि मानणारही नाही. सातारा-जावळी मतदारसंघ हे माझे कुटुंब आहे.

  सातारा : ज्या घराण्याचा वारसा आम्ही चालवतो. त्या घराण्याने कधीही जातीभेद केला नाही. मी तर जात-पात, धर्म- पंथ असा भेदभाव कधीही मानला नाही आणि मानणारही नाही. सातारा-जावळी मतदारसंघ हे माझे कुटुंब आहे. या मतदारसंघातील मागासर्गीय बांधवांच्या समस्या सोडवण्यात आणि त्यांच्या वाडी, वस्तीवरील विकासकामे मार्गी लावण्यात कुठेही  कोठेही कमी पडणार नाही, असा शब्द आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.

  फळणी (ता.जावली) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, यशवंत आगुंडे, राजेंद्र संकपाळ, सदाभाऊ शिंदकर, निलेश शिंदे, लक्ष्मण शिंदे, कोयना पूर्व विभाग पतसंस्था बामणोली व्हा.चेअरमन एन डी कांबळे, ॲड.राजेश कांबळे, के. के. शेलार, शेंबडी ग्रुप ग्रामपंचायत सरपंच संतोष साळुंखे, पोलीस पाटील सखाराम साळुंखे, भैरवनाथ विकास सेवा सोसायटी बामणोली व्हा.चेअरमन रामभाऊ साळुंखे, अशोक शिंदे, राजाराम शिंदे, टी एस पवार, सुधाकर शिंदकर, कमलाकर शिंदकर, रावजी कांबळे, मनोहर कांबळे, सुनिल कांबळे, मधुकर कांबळे, यशवंत कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

  फळणी येथे बौद्धजन विकास मंडळ, सम्राट अशोकनगर यांचे वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. फळणी ते बामणोली अशी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर फळणी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

  जावली तालुक्यात जेवढ्या मागासर्गीयांच्या वस्त्या आहेत त्यांच्या विकासासाठी, खासकरून जावली तालुक्यासाठी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचेकडे पाठपुरावा करून दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. यापुढेही या भागाच्या विकासासाठी, आवश्यक सोयी सुविधा पुरिण्यासाठी करता सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहू, असे शिवेद्रसिंहराजे म्हणाले.

  यावेळी एन. डी. कांबळे यांनी या ठिकाणी एक सुसज्ज असे सांस्कृतिक भवन व्हावे अशी मागणी करताच शिवेद्रसिंहराजे यांनी तात्काळ त्या ठिकाणी नुसती घोषणा न करता नारळ फोडून एक वर्षाच्या आत या ठिकाणी सांस्कृतिक भवानाची इमारत उभी राहील, असा शब्द दिला.

  कार्यक्रमास फळणी गावासह परिसरातील महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.