भिवडी सोसायटीवर आ. शिवेंद्रसिंहराजे गटाची सत्ता ; नेवेकर चेअरमन तर सूर्यवंशी यांची व्हा. चेअरमनपदी निवड

जावली तालुक्यातील भिवडी- नेवेकरवाडी विकाससेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत विरोधी गटाचा पराभव करून आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाने निर्विवाद सत्ता मिळवली.

    पाचगणी : जावली तालुक्यातील भिवडी- नेवेकरवाडी विकाससेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत विरोधी गटाचा पराभव करून आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाने निर्विवाद सत्ता मिळवली. आमदार गटाने १२- १ अशा फरकाने विरोधी पॅनेलचा धुव्वा उडवला.

    सोसायटीच्या चेअरमनपदी चंद्रकांत नेवेकर तर, व्हा. चेअरमनपदी अशोक सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली. या दोघांचाही आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सोसायटीचे संचालक पुंडलिक महामूलकर, विजय चव्हाण, किसन चव्हाण, शरद निकम, बबन भिसे, उषा जांभळे, रामदास आगुंडे, अनिल सपकाळ, सूर्याजी विधाते, राजकुमार दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

    ग्रामस्थ आणि शेतकरी सभासदांनी आपणा सर्वांवर विश्वास टाकून सोसायटीची सत्ता ताब्यात दिली आहे. सोसायटीच्या माध्यमातून सभासद शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करून आपण तो विश्वास सार्थ ठरवावा. शेतकरी, सभासद आणि सोसायटीच्या प्रगतीसाठी सर्वोतोपरी सहकार्य करू, असा शब्द आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी याप्रसंगी दिला.