शिवसैनिकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू; मातोश्रीवरील घटनेने हळहळ

भगवान काळे असे शिवसैनिकाचे नाव असून ते शहापूर येथील आहेत. मातोश्रीवर बैठक सुरु असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले, त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

    मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाने बंडखोरी (Rebellion) केल्यानंतर राज्यभरातील शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पाठिंबा देत आहेत. याच दरम्यान एका शिवसैनिकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू (Heart Attack To Shivsainik) झाला असून त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

    भगवान काळे असे या शिवसैनिकाचे नाव असून ते शहापूर (Shahapur) येथील आहेत. मातोश्रीवर (Matoshree) बैठक सुरु असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले, त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

    एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी शिवसैनिक मुंबईत दाखल होत आहेत.