पोलिसांशी हुज्जत प्रकरण : निलेश राणे यांच्यासह पाच जणांची ओरोस जिल्हा न्यायालयाने पुराव्यांअभावी केली निर्दोष मुक्तता

यावेळी पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी माजी खासदार निलेश राणे यांच्याविरुद्ध ओरोस पोलीस ठाण्यात (Oros Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. याची सुनावणी आज, शनिवारी ओरोस जिल्हा न्यायालयात झाली.

    सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात (Shivsainik Santosh Parab Attack Case) डिसेंबर २०२१ ला आमदार नितेश राणे (Mla Nitesh Rane) यांच्या जामीन अर्जावर (Bail) जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू होती. याच दरम्यान उच्च न्यायालयाकडून (High Court) आमदार नितेश राणे यांना अटकेपासून दहा दिवसांसाठी दिलासा देण्यात आला होता. यावेळी आमदार नितेश राणे कोर्टातून बाहेर पडत असताना पोलिसांकडून आमदार नितेश राणे यांना अटकेचा प्रयत्न केला गेला होता. तेव्हा माजी खासदार निलेश राणे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची (Nilesh Rane dispute with police) झाली होती.

    यावेळी पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी माजी खासदार निलेश राणे यांच्याविरुद्ध ओरोस पोलीस ठाण्यात (Oros Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. याची सुनावणी आज, शनिवारी ओरोस जिल्हा न्यायालयात झाली.

    या प्रकरणात निलेश राणे यांच्यासह भाजपचे आनंद शिरवलकर, श्रीपाद तवटे, कणकवली भाजप अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कुडाळ तालुकाध्यक्ष तुकाराम साईल, रुपेश बिडये यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली (Acquitted for lack of evidence).