गद्दारांची पोरं हातावर ‘मेरा बाप चोर है’ लिहितील : संजय राऊत

काही दिवसांपूर्वीच वैजापूरचे फुटलेल्या आमदारांना महालगावमध्ये केवळ चप्पल मारायचे ठेवले होते, असे म्हटले आहे. सुरक्षा जास्त दिली आहे, पण पुढे त्यांचे भविष्य नाही असेही राऊत म्हटले. तर सुरक्षा काढून मर्दासारखे फिरून दाखवा असे आव्हानही राऊतांनी दिले आहे.

    नाशिक – शिवसेना सोडून गेलेल्या ४० आमदार आणि १२ खासदारांची पोरं हातावर मेरा बाप चोर हे लिहितील, असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले आहे. नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत असताना त्यांनी शिंदे गटावर जहरी टीका केली आहे.

    शिवसेनेचे ४० आमदार आणि १२ खासदार गेले, मात्र शिवसेना पक्ष तिथेच आहे. स्थानिक स्वराज्य संघटनेच्या निवडणुका राज्य सरकार टाळते आहे, ते केवळ भीतीपोटी टाळत आहे, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला आहे.

    शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी नाशिकमध्ये पत्रकारपरिषद घेत शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र डागले आहे. निवणुकीला चिन्ह नवे असले मशाल असले तरी जनता शिवसेनच्या उमेदवारांनाच निवडून देणार आहे, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केली आहे. लोकांमध्ये प्रंचड अशी चीड निर्माण झाली आहे, शिवसेनेला यामुळे कुठेही तडा गेला नाही. मात्र आता जे आमदार, खासदार शिवसेनेतून बाहेर पडले त्यांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावे असे म्हणत शिंदे गटाला आव्हान दिले आहे. हा पालापाचोळा गेला असेही राऊतांनी म्हटले आहे. जनता शिंदे गटातील लोकांना गद्दार आणि खोके वाले म्हणते असे सांगताना संजय राऊत यांनी टीका केली आहे.

    काही दिवसांपूर्वीच वैजापूरचे फुटलेल्या आमदारांना महालगावमध्ये केवळ चप्पल मारायचे ठेवले होते, असे म्हटले आहे. सुरक्षा जास्त दिली आहे, पण पुढे त्यांचे भविष्य नाही असेही राऊत म्हटले. तर सुरक्षा काढून मर्दासारखे फिरून दाखवा असे आव्हानही राऊतांनी दिले आहे.

    संजय राऊत म्हणाले की, माझी जी माहिती आहे,सुहास कांदे आणि भुसे यांच्यात ठिणग्या उडत आहेत. असे म्हणताना नारायण राणे यांच्यावर बोलायची गरज नाही त्यांनी महत्त्व देत नाही, असा टोला राणेंना लगावला आहे. ४० आमदार आणि १२ खासदारांच्या डोक्यावर कायम गद्दारीचा शिक्का राहणार आहे. दिवार चित्रपटात तसे अमिताभ बच्चन यांच्या हातावर मेरा बाप चोर आहे, असे लिहले तसेच आता या आमदारांच्या डोक्यावर गद्दारींचा शिक्का बसला आहे. नाशिक लोकसभेसाठी हेमंत गोडसे हा काय चेहरा होता का नाही, केवळ शिवसेना नावामुळेंच ते निवडून आले, असे म्हणत नवा उमेदवार शिवसेनेचाच निवडून येणार असेही त्यांनी म्हटले आहे.