राज्यातील अनेक ठिकाणी रामदास कदमांविरोधात शिवसेनेचे आंदोलन, प्रतिकात्मक पुतळ्याचे केले दहन

आज पुणे तसेच बीडमध्ये रामदास कदमांविरोधात शिवसैनिक आक्रमक होत आंदोलन केले. तसेच रामदास कदमांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी शिवसेनेच्या महिला आघाडीने कदमांच्या पोस्टरला जोडे मारत घोषणाबाजी दिली. प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच कदमांच्या विरोधात महिलांनी घोषणाबाजी सुद्धा केली.

    मुंबई : शिंदे गटाने बंड केल्यानंतर राज्यात सत्तांतर झालेय. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शपथ घेतली आहे, तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Vice CM Devendra fadnvis) यांनी पदभार स्विकारला आहे. दरम्यान, आमदारांच्या (MLA) बंडानंतर खासदार तसेच नगरसेवक व पदाधिकारी यांनी सुद्धा शिंदे गटात सामील झाले आहेत, त्यानंतर कोणत्या ना कोणत्या कारणावरुन शिंदे गट व शिवसैनिकांमध्ये राडा होत असतो. आता कोकणातील दापोलीमध्ये (Dapoli) शिंदे गट आणि शिवसेना आमनेसामने आले होते. (Shinde group and shivsainik)

    दरम्यान, काही दिवसांपूर्वी दापोलीत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंचा (Udhav Thackeray) एकेरी उल्लेख करत बोचरी टिका केली होती. यावेळी त्यांनी रश्मी ठाकरे यांच्यावर सुद्धा टिका केली होती. या कारणामुंळ रामदास कदमांच्या निषेधार्थ शिवसैनिक आक्रमक झाले असून, रामदास कदमांच्या (Ramdas kadam) शिवसैनिकांनी पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला आहे. आज पुणे तसेच बीडमध्ये रामदास कदमांविरोधात शिवसैनिक आक्रमक होत आंदोलन केले. तसेच रामदास कदमांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी शिवसेनेच्या महिला आघाडीने कदमांच्या पोस्टरला जोडे मारत घोषणाबाजी दिली. प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच कदमांच्या विरोधात महिलांनी घोषणाबाजी सुद्धा केली.