shivsena

शिवाजी पार्कवर होणारा पारंपरिक दसरा मेळावा (Dasara Melava) कोणाचा आणि कुठे होणार? याबाबद सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. यावरुन शिवसेना व शिंदे गट हे दोघेही न्यायालयात गेले असताना, आता यावर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असून, आम्ही दसरा मेळावा शिवाजी पार्कवर करणार अशी आग्रही भूमिका शिवसेनेनं घेतली आहे.

    मुंबई : शिंदे गटानं (Shinde group) केलेल्या बंडामुळं शिवसेनेत (Shivsena) फुट पडली. परिणामी राज्यात सत्तांतर झालं आणि ठाकरे आणि शिंदे गट (Thackeray and shinde) अशी शिवसेनेची विभागणी झाली. दरम्यान, शिवसेनेची ओळख असणारा शिवाजी पार्कवर होणारा पारंपरिक दसरा मेळावा (Dasara Melava) कोणाचा आणि कुठे होणार? याबाबद सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. यावरुन शिवसेना व शिंदे गट हे दोघेही न्यायालयात गेले असताना, आता यावर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असून, आम्ही दसरा मेळावा शिवाजी पार्कवर करणार अशी आग्रही भूमिका शिवसेनेनं घेतली आहे.

    दरम्यान, दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी अद्याप कुणालाच पालिका प्रशासनाकडून (bmc office) परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे आज शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुंबई महापालिकेच्या जी-उत्तर कार्यालयात धडक दिली. तसेच, यावेळी त्यांनी आम्हाला आता परवानगी मिळो न मिळो शिवसैनिक मोठ्या संख्येनं शिवाजी पार्कवर जमणार आहेत, असं म्हटले. दरम्यान, पालिका प्रशासनावर आमचा काडीचाही विश्वास नाही, असं शिवसेना उपनेते मिलिंद वैद्य यांनी म्हटले आहे. दरम्यान, आता शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतल्यामुळं याला शिंदे गटाकडून काय उत्तर येते हे पाहवे लागेल.