nay varanbhat loncha poster

‘नाय वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ (Nay Varan Bhat Loncha , Kon Nay Koncha) या अश्लील मराठी चित्रपटाला शिवसेनेने (Shivseman Demand To Ban Movie) जोरदार विरोध केला असून बंदी घालण्याची मागणी केली आहे.

    मुंबई : चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांचा नवीन मराठी चित्रपट ‘नाय वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ (Nay Varan Bhat Loncha , Kon Nay Koncha) या अश्लील मराठी चित्रपटाला शिवसेनेने (Shivseman Demand To Ban Movie) जोरदार विरोध केला असून बंदी घालण्याची मागणी केली आहे. ‘नाय वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ या महेश वामन मांजरेकर यांच्या मराठी चित्रपटाची जाहिरात यूट्यूबवर दाखविण्यात येत आहे.

    मराठी संस्कृतीचे चुकीचे प्रदर्शन
    दोन शाळकरी मुले या चित्रपटाची मुख्य पात्र असून ही दोन शाळकरी मुले खून करताना, स्वतःच्या काकी बरोबर शारीरिक संबंध करताना दाखवली आहेत. या चित्रपट जाहिरातीमधून सामाजिक संदेश देण्याऐवजी लहान मुलांना गुन्हेगारी विश्वाकडे ढकलले जात असल्याचे दिसून येते. सख्या काकीबरोबर शारीरिक संबंध ही आपली संस्कृती नसून चित्रपटाच्या माध्यमातून अशा पवित्र नात्याची अवहेलना आणि भारतीय संस्कृतीचे तसेच मराठी संस्कृतीचे चुकीचे प्रदर्शन करण्यात आले आहे.  एकीकडे आपण ‘पोस्को’, ‘शक्ती’सारखे कायदे निर्माण करून अशा प्रकारचे गुन्हे नष्ट करण्याच्या, संपविण्याच्या प्रयत्नात असताना दुसरीकडे ‘नाय वरन भात लोणचा, कोन नाय कोनचा’ सारखे चित्रपट प्रदर्शित करून सरकारच्या प्रयत्नांवर पाणी फिरवत असल्याचे दिसून येते.

    अश्लील चित्रपटावर बंदी आणावी
    चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांसारख्या चित्रपट निर्मात्याने प्रसिद्धीसाठी मराठी संस्कृतीवर घाला घालणारे, बीभत्स दर्शन घडवणारे चित्रपट बनविणे अशोभनीय आहे. या अश्लील चित्रपटावर बंदी आणावी तसेच युट्युबवर असलेली जाहिरात कायद्यातील तरतुदी विचारात घेऊन त्वरित हटविण्यात याव्यात, अशी मागणी सानपाडा ७९ प्रभागचे शिवसेना  शाखाप्रमुख बाबाजी इंदोरे यांनी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली असून, या निवेदनाच्या प्रति महाराष्ट राज्याचे मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना दिल्या आहेत.