
शिवसेना पक्षफुटीनंतर शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) वेगळे झाले आहेत. त्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय घेतला.
पुणे : शिवसेना पक्षफुटीनंतर शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) वेगळे झाले आहेत. त्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता पुण्यातील शिवसेना (Uddhav Thackeray) पक्षाचे माजी नगरसेवक राहिलेले श्याम देशपांडे (Sham Deshpande) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
श्याम देशपांडे यांनी पुण्यात शिवसेना शहरप्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यांनी आज भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत देशपांडे यांनी प्रवेश केला. श्याम देशपांडे यांनी पुणे महापालिकेत तीन वेळा नगरसेवकपद भूषविले होते. मात्र, जेव्हा त्यांनी तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यावेळी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर ते गेल्या काही महिन्यांपासून कोणत्याही पक्षात नव्हते. पण आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
2022 मध्ये शिवसेनेतून हकालपट्टी
पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2022 मध्ये हकालपट्टी केली होती. देशपांडे यांनी 2000-2012 या कालावधीत कोथरूड भागातून नगरसेवकपद भूषविले होते. तर 2008-09 मध्ये त्यांनी महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्षपद देखील भूषवले होते.